५१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या… तेजस्विनी सातपुते यांच्याकडे नवी जबाबदारी तर सोमय मुंडे,ऋषिकेश रावले,राजलक्ष्मी शिवणकर पुण्यात
संभाजी पुरी गोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
राज्यांतील महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यांपासून आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका चांगलाच पाहायला मिळत होता.
अशातच सातत्याने बदला होत असून आता तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे,मुंबई नागपूर,नाशिक छत्रपती संभाजीनगर ठाणे धुळे हिंगोली जळगांव येथील अधिकाऱ्यांच्या समावेश आहेत त्यामध्ये पुणेतील शस्त्र निरीक्षक शाखा पोलीस अधीक्षकपदी धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख असलेले तेजस्विनी सातपुते यांची समादेशकपदी बदली करण्यात आली आहे, त्यांना पुणे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पदावर नियुक्ती देण्यात आली आहे, शुक्रवारी राज्य गृह विभागाने राज्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच खांदेपालट केली असून. यामध्ये जवळपास 51 आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तर राज्य पोलीस सेवेतील तब्बल 81 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तसेच सर्व बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी तत्काळ हजर राहण्याचे आदेश देखील राज्य गृह विभागाकडूंन देण्यात आले आहेत.
