एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सोन्याच्या दागिन्याची जबरी चोरी करणा-या गुन्हेगारास पुणे पोलिसांनी केली अटक

सोन्याच्या दागिन्यांची जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांस अटक युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर पोलिसांची दमदार कामगिरी
पुणे :आज दिनांक 28 जून 2025 युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर पोलिसांनी केली अटक सविस्तर वृत्त असे की दिनांक ११जून २०२५ रोजी बंडगार्डन रेल्वे स्टेशन बाहेरील आवारात मुंबईवरून आलेले पुण्यातील नामांकित सोने पेढी शोरूमचे ६९ लाख रु. किं. च्या ७४० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची जबरी चोरी झाल्या बाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गु.र.न १८६/२०२५ मा.न्या.सं.क. ३०९ (४) आर्म अॅक्ट कलम ३(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट ०२ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे तपास करत असताना सदरचा गुन्हा राजस्थान येथील रेकॉर्डवरील आरोपी रूपसिंग गुलाब सिंह रावत, वय ३१ वर्षे रा. देलरा, थाना दिवेर तहसील अमीठ, जिल्हा राजसमद, राजस्थान याने व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ०२ चे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, संजय जाधव यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अमीठ, राजस्थान येथे नमुद आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील व परराज्यात असल्यामुळे तो पोलीसांनी लावलेल्या सापळ्यातुन निसटत होता. त्याच्यावर पाळत ठेवुन गुप्त बातमीदाराच्या व स्थानिक पोलीसांच्या मदतीने दिनांक २६जून २०२५ रोजी आरोपी नाव रूपसिंग गुलाब सिंह रावत, वय ३१ वर्षे, रा. देलरा, थाना दिवेर तहसील अमीठ, जिल्हा राजसमद, राजस्थान वास दिवेर राजस्थान येथुन अटक करण्यात आली आहे. त्याच्या कडून गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी १८,६६,०००/- रु.किं.चे २४९.५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत

सदरची कामगिरी मा. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा.पोलिस उप आयुक्त (गुन्हे), श्री निखिल पिंगळे, मा. पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर अति. कार्यभार (गुन्हे) श्री. विवेक मासाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोलिस अंमलदार संजय जाधव, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, गणेश थोरात, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, ओमकार कुंभार, अमोल सरडे, विनोद चव्हाण, नागेश राख, पुष्पेन्द्र चव्हाण, संतोष टकले, विजय पवार, संजय आबनावे यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link