युवा ग्रामीण पत्रकार संघटना खेड तालुका अध्यक्ष पदी श्री. हंसराज पाटील यांची नियुक्ती
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव: गोपाळ भालेराव
चाकण :ग्रामीण पत्रकारितेत आणि सामाजिक कार्यात सक्रीय भूमिका बजावणारे आणि सातत्याने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे श्री. हंसराज पाटील यांची “राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ” खेड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.ही निवड संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. गणेश महाडिक यांच्या उपस्थितीत आणि मा. कांताभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी संतोष लांडे (विभागीय अध्यक्ष),श्री.गोपाळ भालेराव पुणे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण सतीश कुमार कोकरे (हवेली तालुका अध्यक्ष), अमित मोरे (हवेली तालुका उपाध्यक्ष), संतोष सातकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते
नवीन नियुक्तीच्या निमित्ताने श्री. हंसराज पाटील यांना परिसरातील पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील काळात ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी सक्रीय काम करण्याचा निर्धार श्री. हंसराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.आणि वरील सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.
