तीन हजार होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना श्री चॅरिटेबल संस्थेतर्फे मोफत बारी समाज विद्यालय शिरसोली येथे शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे -: मा.ना. गुलाबराव पाटील साहेब पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा मा.श्री अशोकभाऊ जैन अध्यक्ष- भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगांव यांच्या अनमोल सहकार्याने बारी समाज माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषदेच्या ३००० होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य (६ वह्या, २ पेन, २ पेन्सिल, खोडरबर,शार्पनर ) वितरण करण्यात आले.
मा.ना.गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना सांगितले की “वह्या व लेखन साहित्य वितरण करतांना याठिकाणी विद्यार्थ्यांचे पालक कुठल्या पक्षाचे किंवा धर्माचे आहे हे बघितले नाही प्रत्येक विद्यार्थी हा आपला आहे ही धारणा मनात ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टींची पूर्तता करण्याचा प्रयत्न करू” अशी ग्वाही देखील पालकमंत्री महोदयांनी दिली.
श्री चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष शाम कोगटा यांनी आभार मानतांना सांगितले की मा.ना.गुलाबराव पाटील साहेब व आदरणीय अशोकभाऊ जैन यांच्या अनमोल सहकार्याने मोफत वह्या व लेखन साहित्य वाटपाचा कार्यक्रम राबविणे संस्थेला शक्य होत असते
गेल्या ३३ वर्षापासून अखंडित वह्या व लेखन साहित्य वाटपाचा कार्यक्रम संस्था करीत आहे आणि यापुढे देखील हा वितरण सोहळा असाच चालू राहील हे देखील सांगीतले.
*वह्या व लेखन साहित्य वितरण कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी,शाम कोगटा,नगरसेवक मनोज चौधरी,योगेश कलंत्री,अनिल पाटील,भगवान पाटिल,अनिल महारू पाटील,बापू मराठे,शरद कोळी मंचावर स्थानापन्न होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील सर यांनी केले तर यशस्वितेसाठी युवासेना महानगर उपाध्यक्ष पवन ठाकूर, बबन धनगर,अविनाश पाटील,निरज वाणी,रमेश माळी,प्रविण बिऱ्हाडे, रोहित गोसावी,विजय यादव,प्रशांत ठाकरे,कैलास ठाकरे,मानस तळेले,निलेश बारी,विक्की बारी, ओम महांगडे,जीवन कोळी यांनी परिश्रम घेतले.
वितरण सोहळ्यासाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते
