अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दलित सेनेच्या वतीने विनम्र अभिवादन,
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील आर टी ओ शेजारी
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल (AISSMS) शाळेच्या आवारामध्ये शाहू महाराज यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील यादव म्हणाले शाहू महाराजांनी 1902 रोजी शासकीय नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षणाची घोषणा केली ज्याने मागासलेल्या समुदायांना मोठा दिलासा मिळाला,
कोल्हापूर संस्थानात शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी लढा दिला असे सांगितले
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वसंत बोले, काळूराम ससाणे, पुणे जिल्हाध्यक्ष शशिकांत शेलार, पुणे शहर अध्यक्ष प्रदीप गायकवाड, पिंपरी चिंचवड अध्यक्ष शशिकांत कांबळे, सीमा कांबळे, सविता कांबळे, वैशाली कांबळे, विद्या पंदिरकर, शैलेंद्र चव्हाण, मिलिंद कांबळे, राजू आगरकर, सिकंदर इंगळे, शीलवंत कांबळे, सुहास साठे, संजय लोंढे, प्रताप जावळे, अर्जुन काळे, कुमार भोसले, आदि यावेळी उपस्थित होते
