स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सामाजिक कार्यात वेगळा ठसा
प्रतिनिधी -सारंग महाजन.
आमदार संग्राम जगताप यांचे गौरवोद्गार
अहिल्यानगर – सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, धार्मिक, जनजागृती या माध्यमातून स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सामाजिक कार्यात वेगळा ठसा उमटविला आहे, असे गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी काढले.
स्नेहबंध च्या वतीने नुकताच विविध क्षेत्रातील ३० जणांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ देऊन करण्यात आले. याबद्दल डॉ.शिंदे यांचा आमदार जगताप यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, साई ट्रॉफीचे संचालक सचिन पेंडुरकर, इंजिनिअर अभिजीत ढाकणे उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, समाजाला दीर्घकाळ उपयोगी पडेल असे रचनात्मक काम डॉ. उद्धव शिंदे हे करत आहेत. शिंदे करत असलेले सामाजिक काम हे निश्चितच त्यांच्या नेतृत्वाचा परीघ विस्तारणारे आहे.
स्नेहबंध या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कामामुळे उद्धव शिंदे हे नाव जिल्हाभरात पोहचले आहे. २०१७ पासून स्नेहबंध सातत्याने सामाजिक काम करत आहे. यामुळेच स्नेहबंध ही केवळ संस्था न राहता एक ‘चळवळ’ बनली आहे. या फाउंडेशन च्या माध्यमातून माध्यमातून गोरगरिबांना शिक्षणासाठी, ज्येष्ठांना आरोग्यासाठी, मजुरांना डोक्यावर टोपीची होणारी मदत खूप मोलाची आहे.
