टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हातर्फे रक्तदान शिबीर संपन्न
प्रतिनिधी सारंग महाजन.
टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव ,यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हयातर्फे सिंदखेड राजा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते*
सध्या आपल्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा प्रचंड प्रमाणात भासत आहे ,हे लक्षात घेता टायगर ग्रुप बुलडाणा जिल्ह्यातर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले
यावेळी टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल राठोड ,टायगर ग्रुप देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष योगेश पवार,सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष पवन मेहेत्रे,वैभव लोढे,देवानंद डिघोळे, शरद बोडखे,रघुनाथ जाधव,संजय जायभाये,सचिन भुतेकर,प्रताप गवई,वैभव भुतेकर,अमोल हिवाळे, प्रणव उबाळे,जालना रक्तपेढी जालना जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब कटोरे आणि सहकारी व टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते..
