चौसाळा येथिल भीमनगर येथील सिमेंट बाकडयाची अज्ञात समाज कंटकाने केली तोडफोड
(चौसाळा प्रतिनिधी)
बीड तालुक्यातील चौसाळा येथील भीमनगर याठिकाणी ग्रामपंचायत मार्फत बसविण्यात आलेल्या सिमेंट बाकडयाची अज्ञात समाज कंटकाने तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली असुन यामुळे आंबेडकरी जनतेमधुन ञिव प्रतिक्रिया उमटत असुन संबंधित समाजकंटकाला तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी समस्त आंबेडकरी जनतेतून होत आहे.
चौकट
संबंधित समाजकंटकाने भीम नगर येथील सिमेंट बाकडयाची तोडफोड केली असुन यामुळे समस्त आंबेडकरी जनतेत ञिव रोष असुन तरी पोलीस प्रशासनाने तात्काळ या घटनेची दखल घेऊन संबधीत संमाज कंटकाला तात्काळ अटक करावी अन्यथा समस्त आंबेडकरी समाजाला सोबत घेऊन ञिव स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
विवेक कुचेकर
सामाजिक कार्यकर्ता चौसाळा
