सरकटे वझर ते वाटूर निकृष्ट दर्जाच्या कामाची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याकडून पाहणी
प्रतिनिधी.नामदेव मंडपे.मंठा.जालना
तालुक्यातील सरकटे वझर ते वाटुर यादरम्यान बेलोरा येथे रस्त्याची अत्यंत निकृष्ट कामे चालू आहेत.या कामाची दिनांक २४ जुन २०२४ रोजी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहाणी केली असता अंत्यंत निकृष्ट दर्जा आढळून आला आहे
.मंठा परतुर नेर सेवली मतदारसंघामधे असे अनेक कामे संबंधित कार्यकारी अभियंता व स्थानिक आमदार बबन लोनीकर यांच्या संगणमताने निकृष्ट व बोगस करण्यात आलेली असल्याने लवकरच यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन संबंधित कामाचे अभियंता , कार्यकारी अभियंता ,गुत्तेदार व स्थानिक आमदार बबन लोनीकर यांची लेखी तक्रार करणार आहे असे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी यावेळी बोलतांना सांगितले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव,गणेश खरात ,रंजीत चव्हाण सुरज गवळी प्रकाश खाडे दिलीप मगर शरद वाघमारे सचिन वाघमारे बंडूकोरडे विष्णू मुंडे नवनाथ मुंडे अनिल मुंडे सुनील गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
