थेपडे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे दिनांक २१ जून २०२५ रोजी स्वा सै पं धथेपडे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी डी चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांनी योगाचे महत्त्व, त्याचे मानसिक व शारीरिक फायदे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले
योग प्रशिक्षक श्री पी पी मगरे सर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने जसे की ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, प्राणायाम इ. शिकली आणि प्रत्यक्षात सादर केली. उपस्थित सर्वांनी एकत्रितरित्या योगाभ्यास करून एक सकारात्मक वातावरण निर्माण केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याची जाणीव निर्माण झाली असून, त्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा शिक्षक श्री. गिरासे सर यांनी केले. शेवटी उप मुख्याध्यापक श्री जी डी बच्छाव सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.या कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री के पी पाटील सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला आणि अनमोल असं सहकार्य केले .
