एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने ५३ वर्षीय महिलेवर जीवन वाचवणारी यशस्वी शस्त्रक्रिया केली  गंभीर श्वसनमार्ग अडथळ्याच्या प्रकरणात यश

तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने ५३ वर्षीय महिलेवर जीवन वाचवणारी यशस्वी शस्त्रक्रिया केली  गंभीर श्वसनमार्ग अडथळ्याच्या प्रकरणात यश

प्रतिनिधी सतीश कडू नागपूर

नागपूर, जून 2025: चंद्रपूरच्या 53 वर्षीय महिलेला गंभीर स्थितीत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. तिच्या छातीत मोठा ट्युमर आढळून आला होता जो श्वासनलिका (ट्रॅकिया)वर दाब देत होता, त्यामुळे एक फुफ्फुस पूर्णपणे बंद झाले होते आणि दुसरे जवळपास पूर्णपणे बंद होण्याच्या स्थितीत होते.
ही महिला गेल्या 10 दिवसांपासून तीव्र श्वास घेण्यास त्रास, खोकला व छातीत दुखणे यासारख्या त्रासांनी पीडित होती. तिची प्रकृती 2 जून 2025 रोजी अधिकच बिघडली. सुरुवातीला वरोरा येथील रुग्णालयात प्रथम दाखल झाल्यानंतर तिच्या डाव्या वोकल कॉर्डचे पक्षाघात झाले असल्याचे निदान झाले. तिचा श्वास घेण्याचा त्रास झपाट्याने वाढल्यामुळे तिला इंट्युबेट करून तातडीने वॉकहार्ट हॉस्पिटल, नागपूर येथे हलवण्यात आले..
वोक्हार्ट येथे तपासणी दरम्यान, सीटी स्कॅन आणि डायग्नोस्टिक ब्रॉन्कोस्कोपी करण्यात आली, ज्यामध्ये छातीच्या मध्यभागी (मीडियास्टिनममध्ये) एक मोठी गाठ आढळून आली जी तिच्या श्वसनमार्गावर दाब टाकत होती. यामुळे तिची श्वासनलिका जवळजवळ पूर्णतः बंद झाली होती आणि उजव्या मुख्य ब्रॉन्कसचा मार्ग पूर्णतः बंद झाल्यामुळे फुफ्फुस कोलमडले होते व त्यात हवा अडकली होती. तसेच डाव्या ब्रॉन्कसचाही मार्ग जवळजवळ पूर्ण बंद झालेला होता.
परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे एक अत्यंत गुंतागुंतीची व उच्च जोखमीची शस्त्रक्रिया नियोजित करून यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. ही शस्त्रक्रिया ईसीएमओ तज्ञ डॉ. चेतन शर्मा, डॉ. राहुल हिवांज, डॉ. सुमित नारंग, डॉ. समीर अर्बट (इंटरव्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट), डॉ. अवंतिका जयस्वाल, ऍनेस्थेटिस्ट, डॉ. बारोकर, डॉ. विजया लांजे आणि डॉ. बेलेकर यांच्या नेतृत्वाखालील बहुवैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमने यशस्वीरीत्या पार पाडली.
5 जून 2025 रोजी रुग्णावर रिजिड ब्रॉन्कोस्कोपिक क्रायोबायॉप्सी आणि इलेक्ट्रोकॉटरीद्वारे ट्युमर काढण्याची यशस्वी प्रक्रिया पार पडली. यावेळी श्वसनमार्ग खुला राहावा म्हणून Y-आकाराचा एअरवे स्टेंट बसवण्यात आला. ही शस्त्रक्रिया VV-ECMO सपोर्ट (फुफ्फुसांना आधार देणारी विशेष तंत्रज्ञान) आणि यांत्रिक व्हेंटिलेशनच्या सहाय्याने पार पाडण्यात आली, कारण शस्त्रक्रियेच्या दरम्यान रक्तस्राव होण्याची आणि श्वासनलिका कोसळण्याचा धोका खूप मोठा होता.
शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रक्तस्राव प्रभावीपणे नियंत्रणात ठेवण्यात आला. रुग्णाला आयसीयूमध्ये बारकाईने देखरेखीखाली ठेवण्यात आले तिच्या पुनर्प्राप्तीसाठी रक्त चढविणे व औषधोपचार देण्यात आले.. 7 जून रोजी करण्यात आलेल्या फॉलोअप ब्रॉन्कोस्कोपीमध्ये दोन्ही श्वसनमार्ग खुले असल्याचे स्पष्ट झाले आणि रुग्णाने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

डॉ. समीर अर्बट यांनी सांगितले की, ही एक अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेणी केस होती. वेळीच केलेली आधुनिक ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया आणि ECMO सपोर्टमुळे रुग्णाचे प्राण वाचवता आले. त्यांनी या यशस्वी उपचारामागे असलेल्या संपूर्ण वैद्यकीय टीमच्या उत्कृष्ट समन्वय आणि कौशल्याचे विशेष कौतुक केले.
सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून कॅन्सरसाठी पुढील वैद्यकीय उपचार घेत आहे.
ही केस वेळेवर निदान, प्रगत पल्मोनोलॉजी प्रक्रिया आणि काळजीपूर्वक क्रिटिकल केअर उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करते – जे अशा आपत्कालीन प्रसंगात जीव वाचवण्यास महत्त्वाचे ठरतात.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link