अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जिच्यावर जीवापाड प्रेम ती शिवसेना ५९ वर्षाची झाली महेश पाटील
प्रतिनिधी:-दौलत सरवणकर ठिकाण:- उंब्रज,कराड
१९, जून १९६६ साली मुंबईत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली
इवलेसे रोप लावले त्याचा आज वटवृक्ष झाला
१९९५ साली शिवसेनेचा पहिला
मुख्यमंत्री मनोहर जोशी व
२८ नोव्हेंबर २०१९ शिवसेनेचे दुसरे
मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे
शिवसेनेची घोडदौड अशीच चालू राहिली
म
सर्वांनी डोळ्यांनी पाहिले आज शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनाच्या लाख लाख भगव्या शिवमय शुभेच्छा
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
अभ्यास केंद्र उंब्रज ता कराड जिल्हा सातारा
शिवसेनेच्या विषयी माझ्या काही आठवणी शिवसैनिक
श्री महेश भगवंत पाटील
मु पो विरवडे ता कराड
जिल्हा सातारा
पिन कोड४१५१०५
मो नं ९९२२६३६५०६
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा कराड तालुक्यातील विरवडे गावचे शिवसैनिकाने गेल्या २५ वर्षातील दैनिक सामना अंकाचे जीवापाड जतन केले शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने प्रभावित होऊन पश्चिम महाराष्ट्र मध्ये शिवसेनाप्रमुखांच्या सभेला शिवतीर्थावर दसरा मेळावा, शिवसेना वर्धापन दिन, आवर्जून सातत्याने उपस्थित राहणारा शिवसैनिक महेश पाटील .(विरवडे तालुका कराड) असे आहे विरवडे ता. कराड ,येथे १९९१ साली शिवसेनेची शाखा स्थापन करण्यात आली . करण्यात या शाखेचे शिवसैनिक म्हणून महेश पाटील आजही अविरतपणे काम करीत आहेत. १९९७ साली पुणे येथील सारसबाग येथे शिवसेनाप्रमुखांची सभा आयोजित केली होती या सभेला महेश पाटील पहिल्यांदाच उपस्थित राहिले. यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या २०सभा जवळून पाहिल्या त्यामध्ये कोल्हापूर , कराड , कोरेगाव, फलटण, पाटण ,मालवण , पुणे, मुंबई
येथील सभेला प्रामुख्याने हजेरी लावली. शिवतीर्थावरील दसरा मेळावा , शिवसेना वर्धापनदिन, शिवसेनाप्रमुखांची पुण्यतिथी, याला ते आजही न चुकता प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात. दैनिक सामना सुरू झाल्यापासून महेश पाटील दैनिक सामनाचे वाचक आहेत. तर ” दैनिक सामना ” चे अंक जतन करण्याचा त्यांना छंद लागला प्रारंभीच्या २५ वर्षातील अंक त्यांनी जपून ठेवले होते मात्र वाळवी व पावसामुळे ते अंक खराब झाले सध्या महेश पाटील यांच्याकडे दैनिक सामना
चे अंक जतन करून ठेवले आहेत. महेश पाटील यांचा एक पण होता.
” नारायण राणीची शिवसेनेतून हकालपट्टी ते शिवसेनेची सत्ता “असे अंक जपून ठेवून त्यांचा पन पूर्ण.२८ नोहेंबर २०१९ शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
माझा पन पूर्ण ( ४ जुलै २००५ नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी) २३ जानेवारी २००६, हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस महेश पाटील यांनी कराडहून सरळ ” मातोश्री ” ला फोन करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या होत्या.यावेळी त्यांनी टेलीफोन खात्याकडून एस,टी,डी , कॉल दारे केलेल्या फोनचे बिल जपून ठेवले आहे. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्यक्ष फोन उचलून शुभेच्छा स्वीकारली असल्याची आठवण सद्गदित होऊन महेश पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. २३ जानेवारी २०१२ हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनाप्रमुखांची रुद्राक्ष तुला केली होती. ६२ किलो वजनाच्या रुद्राक्षांची संख्या सुमारे २२ हजार २३४ अशी होती. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद रुपी रुद्राक्ष महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वितरित करण्यात आले होते. महेश पाटील यांनी मुंबई येथे जाऊन दोन रुद्राक्ष घेतले. दोन रुद्राक्ष आजही ते दोन रुद्राक्ष त्यांनी जपून ठेवले आहेत. व गळ्यामध्ये परिधान केले आहेत. महेश पाटील शिवसेनाप्रमुखांचे दसरा मेळावा व सभा झालेल्या भाषणांचे १९९४ ते २०१० पर्यतच्या सीडीची कॅसेट जपून ठेवले आहेत. फेब्रुवारी २००४ कराड प्रीतिसंगम घाट येथे झालेल्या नाट्यसंमेलन वेळी श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी ” महेश असल शिवसैनिक मोजपट्टी लावून बघा “असे व्यंगचित्र काढून दिले आहे. महेश पाटील यांनी हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या पुस्तकांचा संग्रह केला आहे. केला आहे अंगार ,एक धगधगता विचार, हिंदुत्वाचा यज्ञकुंड, साहेब, फटकारे ,महाराष्ट्र देशा, पहावा विठ्ठल, इत्यादीचा संग्रह केला आहे. तसेच बाबरी मशीद आंदोलन १९९२ महेश पाटील यांचा सहभाग. तसेच २४ नोव्हेंबर २०१८ रोजी शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्यासमवेत आयोध्या वारी (आठ दिवस सहभाग). पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या प्रत्येक कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहतात तसेच ७ मार्च २०२० पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात अयोध्येत उपस्थित होते
दैनिक सामना संग्रहाचे आज हिंदुरुदय सम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्रात रूपांतर झाले आहे आज शिवसेना व शिवसेनाप्रमुख यांच्यावर अभ्यास करण्यासाठी अभ्यास केंद्रात दूरदूरचे लोक येत आहेत द हिंदू बिजनेस लाईनचे उपसंपादक डॉक्टर राधेश्याम जाधव यांनी दैनिक सामना संग्रहाचा अभ्यास करून ट्रेल ऑफ द टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुस्तक लिहिले गेले आहे तसेच भूम धाराशिव येथील शंकरराव पाटील महाविद्यालय येथील प्राध्यापक नंदकिशोर जगदाळे शिवसेनाप्रमुखांचे वर पीएचडी करण्यासाठी दैनिक सामना संग्रहास भेट देऊन अभ्यास केला
दैनिक सामना संग्रह अभ्यास केंद्रास मान्यवरांच्या भेटी..
खासदार श्रीकांत शिंदे शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे,उपनेते नितीन बानुगडे पाटील, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, आ भास्कर जाधव, मा आमदार विनोद घोसाळकर,शिवसेना प्रवक्ते अनिशजी गाढवे ABP माझा प्रतिनिधी निलेश बुधावले,द हिंदू बिजनेस चे डॉ राधेश्याम जाधव,केशरीनाथ पाटील, रामदास ढोणे,* शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदाधिकारी आवर्जून दैनिक सामना संग्रह अभ्यास केंद्रास भेट देतात कल्याणचे ज्येष्ठ शिवसैनिक मारुती माने यांनी दैनिक सामना संग्रह अभ्यास केंद्रास पंधरा हजार रुपये किमतीची शिवसेना, शिवसेनाप्रमुख ,प्रबोधनकर ठाकरे यांच्यावरील पुस्तके भेट दिली
आपल्या या अभ्यास केंद्रास
खासदार अनिलभाऊ देसाई शिवसेना नेते सचिनभाऊअहिर शिवसेना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान साहेब संतोष वैद्य* या सर्वांनी आपल्या अभ्यास केंद्रासाठी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
अभ्यास केंद्र उंब्रज ता कराड जिल्हा सातारा
