अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
एअरटेलने ऑनलाइन फसवणुकीवर कडक कारवाई केली: महाराष्ट्र आणि गोव्यात दररोज 2 लाख ग्राहकांना संरक्षण दिले
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर, 19 जून 2025: भारती एअरटेल (“एअरटेल”) ने महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांना वाढत्या ऑनलाइन फसवणुकींपासून संरक्षित करण्याच्या आपल्या मोहिमेत महत्त्वपूर्ण प्रगती जाहीर केली आहे. एआय-संचालित फसवणूक शोध प्रणालीच्या देशव्यापी अंमलबजावणीचा एक भाग म्हणून, एअरटेलने त्यांची प्रगत फसवणूक शोध प्रणाली लाँच केल्यानंतर अवघ्या ३६ दिवसांत महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमधील २ लाखांहून अधिक ग्राहकांना यशस्वीरित्या सुरक्षित केले आहे.
सर्व एअरटेल मोबाईल आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी स्वयंचलितपणे सक्रिय केलेली ही प्रगत प्रणाली एसएमएस, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल आणि इतर ब्राउझर्समधील लिंक्स स्कॅन आणि फिल्टर करते. ही प्रणाली प्रत्यक्ष वेळेतील (रिअल-टाईम) धोका ओळखण्याची क्षमता वापरते आणि दररोज 1 अब्जांहून अधिक URL तपासते. ही प्रणाली हानिकारक साइट्सवरचा प्रवेश 100 मिलीसेकंदांच्या आत अवरोधित करते.
उदाहरणार्थ, जर पुण्यातील एखाद्या रहिवाशाला असा संशयास्पद संदेश मिळाला की: “आपला पॅकेज यायला उशीर झाला आहे. येथे ट्रॅक करा: http://www.tracky0urparcell.com” आणि जर तो रहिवासी निष्काळजीपणे त्या लिंकवर क्लिक करतो, तर एअरटेलची प्रणाली त्वरित सक्रिय होते. ही लिंक लगेच स्कॅन केली जाते आणि जर ती संशयास्पद आढळली, तर त्या साइटवरचा प्रवेश त्वरित अवरोधित केला जातो. वापरकर्त्याला “ब्लॉक केले आहे! एअरटेलने ही साइट धोकादायक असल्याचे आढळले आहे!” असा इशारा देणाऱ्या संदेशाकडे वळवले जाते. हे सर्व क्षणार्धात घडते. ही प्रत्यक्ष वेळेतील (रिअल-टाईम) कारवाई वापरकर्त्यांना सर्व प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवते.
या उपक्रमाबाबत भाष्य करताना, भारती एअरटेलचे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज मॅथन म्हणाले, “एअरटेलमध्ये आमची मुख्य बांधिलकी ग्राहकांना सर्व प्रकारच्या फसवणुकींपासून संरक्षण देण्याची आहे. आमच्या नेटवर्कची एआय-आधारित फसवणूक शोध प्रणालीसोबत सांगड घालून, आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की आमचे ग्राहक कोणत्याही नव्याने उद्भवणाऱ्या धोकेपासून कोणतीही अतिरिक्त मेहनत न करता सुरक्षित राहतील. आजच पावले उचलून डिजिटल भविष्यासाठी सुरक्षा निर्माण करणे अत्यावश्यक आहे, असे आम्हाला वाटते आणि महाराष्ट्र आणि गोव्यातील आमच्या ग्राहकांसाठी सर्वसमावेशक आणि अधिक सुरक्षित नेटवर्क उपलब्ध करून देणारे आघाडीचे कंपनी म्हणून आम्हाला अभिमान वाटतो.”
महाराष्ट्र आणि गोवा हे भारतातील सर्वात डिजिटलदृष्ट्या प्रगत राज्यांपैकी एक मानले जात असल्याने, ऑनलाइन फसवणुकीचा धोका आता शहरी तसेच ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे. फसवणूक करणारे आता फिशिंग लिंक्स, बनावट डिलिव्हरी संदेश आणि खोट्या बँकिंग अलर्टद्वारे अधिकाधिक वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. सातारा, नाशिक, अमरावती, अहिल्यानगर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अकोला यांसारख्या शहरांमध्ये तसेच जामगाव, घोटी, सुलतानपूर, टिपेश्वर यांसारख्या दुर्गम गावांमध्ये अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एअरटेलचे हे समाधान संपूर्ण राज्यासाठी एक डिजिटल सुरक्षा कवच म्हणून काम करते, जे कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, विद्यार्थी आणि पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणाऱ्यांना समान पद्धतीने सुरक्षित ठेवते.
एआय-आधारित ही प्रणाली वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत, मराठीसह, फसवणुकीचे इशारे देते, ज्यामुळे ही सेवा राज्याच्या विविध भाषिक लोकसंख्येसाठी अत्यंत प्रभावी ठरते. ही बहुभाषिक सुविधा विशेषतः अशा जिल्ह्यांमध्ये उपयुक्त ठरते, जिथे डिजिटल साक्षरता कमी आहे किंवा जिथे इंग्रजीचा वापर फारसा केला जात नाही.
हे सोल्यूशन पृष्ठभागावर न दिसता, पार्श्वभूमीत शांतपणे कार्य करते, यासाठी कोणतीही स्थापना (इन्स्टॉलेशन) आवश्यक नसते आणि ही सेवा पूर्णपणे मोफत प्रदान केली जाते. महाराष्ट्र आणि गोवा हे ऑनलाइन बँकिंगपासून ते शासकीय ई-सेवा पर्यंत डिजिटल स्वीकारण्याच्या आघाडीवर आहेत, आणि एअरटेलचा हा उपक्रम संपूर्ण राज्यात अधिक सुरक्षित डिजिटल पर्यावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. साताऱ्यातील एखादा व्यावसायिक असो, नाशिकमधील एखादी गृहिणी, गोव्यातील एखादा पर्यटक किंवा अहिल्यानगर एखादा विद्यार्थी, एअरटेल प्रत्येक डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित बनविण्यास मदत करते.
