अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दिवा प्रतिष्ठानची वाचकांसाठी असलेली अभिनव स्पर्धा स्पृहणीय…इंजी. बाळासाहेब मगर
प्रतिनिधी रविंद्र पाटील नाशिक
नाशिक : दिवाळी अंकांचे संपादक आणि प्रकाशक हे गेले शतकभरापेक्षा जास्त काळ मराठी भाषा समृद्ध करण्याचे काम करतात. रोज वेगवेगळ्या स्पर्धा कुठे तरी होत असतात परंतु दिवाळी अंक वाचकांसाठी एक वेगळी अभिनव अशी स्पर्धा ज्यामध्ये किमान दहा दिवाळी अंक वाचून आपल्याला आवडलेल्या साहित्याविषयी लिहायचे असते अशी आगळीवेगळी स्पर्धा दिवा प्रतिष्ठान घेते ही अतिशय आनंदाची, अभिमानाची बाब असून स्पृहणीय स्पर्धा म्हणून याल स्पर्धेचा उल्लेख करावा लागेल असे प्रतिपादन नाशिक कवी संस्थेचे अध्यक्ष इंजी.बाळासाहेब मगर यांनी केले ते दिवा प्रतिष्ठानच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे अध्यक्ष सतीश बोरा यांनी अनेक दिवाळी अंकांची परंपरा यापुढेही सुरूच राहील फक्त संपादक प्रकाशकांनी अधिक सजग होवून काळानुरूप बदलले पाहिजे तर दिवाळी अंकांकडे नव्या पिढीचे वाचक आकर्षित होतील असा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांतदादा शेवाळे होते. प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे यावर्षी नाशिक येथून प्रकाशित होणाऱ्या सुभाषित दिवाळी अंकाचे संपादक सुभाष सबनीस आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश बेलेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे दिवा प्रतिष्ठानच्यावतीने अभिनव वाचक स्पर्धेतील विजेते स्नेहल संजय पोटे-बेळगाव, सायली वैद्य-मुंबई, डॉ.प्रभाकर शेळके-जालना, रेखा नाबर-मुंबई, प्रज्ञा जांभेकर-मुंबई, श्रद्धा वझे-कल्याण यांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांतदादा शेवाळे, उपाध्यक्ष भारतभूषण पाटकर, सुनील उंब्रजकर, विवेक मेहेत्रे, विजय पाध्ये आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी प्रतिष्ठानची वार्षिक सभा संपन्न झाली. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध दिवाळी अंकांचे संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदिप चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, विवेक उगलमुगले, डॉ.यशवंत पाटील, सुशीलाताई संकलेचा, नंदकिशोर ठोंबरे, मनमाडचे कवी संदीप देशपांडे आणि नाशिकमधील साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
