प्रतिनिधी अदित्य चव्हाण
पुणे- जेजुरी मोरगाव रोड वर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्वीफ्ट कारने पीकअप ला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात एका महिलेसह आठ जण ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मोरगाव कडे जाणारी स्वीफ्ट डिझायर कार (एम एच ४२ – ए एक्स -१०६०) श्रीराम ढाब्या समोर पिकअप टेम्पो मधील (एम एच १२ एक्स एम ३६९४ ) साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली.
धडक एवढी जोरदार होती की शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कार (एम एच १२ टी के ९४८३) ला स्वीफ्ट कार जाऊन धडकली. या भीषण अपघातात टेम्पो मधील वस्तू खाली करणारे दोघेजण, श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे तर स्वीफ्ट डिझायर कार मधील तिघे जण जागेवरच ठार झाले आहेत. तर दोन मुले,
