महाराष्ट्र राज्यातील रुग्णवाहिका चालक-मालक यांच्यासाठी शासन दरबारी महाशक्ती अँब्युलन्स असोसिएशनने मांडली मागणी
मुंबई प्रतिनिधी किशोर गुडेकर
मुंबई, दि. १७ जून:
राज्यातील रुग्णवाहिका चालक व मालक यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाशक्ती अँब्युलन्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांनी शासनाकडे विविध मागण्या सादर केल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ॲम्बुलन्स चालक मालक यांच्यावतीने महाशक्ती असोसिएशनचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे खाजगी सचिव अनिकेत मानोरकर यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे परिवहन विभागाचे राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ यांच्याकडेही त्या स्वरूपाचे पत्र देण्यात आली आहे. आणि माधुरीताई यांनी आपण नक्कीच विचार करून इतर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश देऊन आपल्या बाकी खाली दिल्याप्रमाणे इतर मागण्यांचा विचारही करण्याची आश्वासन दिले.
या निवेदनात रुग्णवाहिका चालक व मालक यांच्यासमोर निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक व प्रशासकीय अडचणींचा आढावा घेण्यात आला आहे. मागण्यांमध्ये मुख्यतः खालील बाबींचा समावेश आहे:
रुग्णवाहिका सेवेसाठी दर निश्चित करावेत.
या क्षेत्रासाठी महामंडळ स्थापन करून असोसिएशनच्या प्रतिनिधीला सदस्यत्व द्यावे.
रुग्णवाहिका सेवा खासगी सेवा नसून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा भाग असल्याने शासकीय योजनांचा लाभ मिळावा.
रुग्णवाहिकांवरील इंधन, टोल, विमा, पाणी पुरवठा यावर सवलत द्यावी.
वाहनचालकांसाठी आरोग्य व अपघात विमा, सेवानिवृत्ती योजना लागू कराव्यात.
अपघातग्रस्त वा मृत्यूमुखी पडलेल्या चालक कुटुंबीयांना तत्काळ शासकीय मदत मिळावी.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद कात्रजकर, सचिव अर्जुन चव्हाण, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मुकुंद कांबळे,मुंबई संपर्कप्रमुख संतोष मोहिते यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या काही वर्षांत रुग्णवाहिका चालविणाऱ्यांना कोणतीही सवलत मिळालेली नाही. शासनाने या गंभीर विषयाची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याची दुसरी प्रत परिवहन विभागाचे राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ यांच्याकडे सुद्धा देण्यात आली आहे. हो
