चौसाळा बायपासवर होणारया वाटमारी थांबणार का
स्थानिक गुन्हे शाखेने लक्ष देवून या चोंरांचा बंदोबस्त करावा
(बीड प्रतिनिधी ) विवेक कूचेकर
बीड जिल्हयातील सोलापुर -बीड महामार्गावरील चौसाळा बायपासवरती होत असलेल्या चोरया आणि लुटमारीच्या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण असुन चौसाळा बायपास वरती चालत्या व थांबलेल्या वाहनातुन मालाची चोरी, प्रवाशाना थांबवुन लुटमार करण्याचे प्रकार रोज घडत असल्यामुळे या परिसरातील नागरिक व प्रवशामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महीनाभरापासुन या चौसाळा बायपासला चोरटयानी लक्ष केले असुन एकटा दुचाकी चालकाला लुटमारीच्या घटनातर अनेक घडल्या आहेत धाराशिव येथिल मोरे नामक दुचाकी चालकाला याच बायपासवरती मारहाण करुन रोख रख्खम काढून घेण्यात आली होती तर नांदुर चौसाळा रोडवरती दामत्याला लुटले होते तसेच चौसाळा येथिल सामाजिक चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते विवेक कुचेकर याना देखील लुटण्याचा प्रयत्न या बायपास वरती झाला होता तर या बायपास वरून अनेक मालवाहु ट्रक जातात हे चोरटे चालत्या ट्रकवर चढुन ट्रकमधील सामान गायब करीत आहेत या बायपासवरती कुठलीच गोष्ट साध्य नाही झाली तर आसपास असलेल्या शेतकरी वर्गाचे गुरे किंवा शेतातील माल घेवून हे चोरटे पसार होत आहेत गेल्या वीस दिवसापुर्वी चौसाळा घारगाव रस्तयावरील पांडुरंग कळासे या शेतकऱ्याच्या दहा शेळया या चोरटयानी चोरून घेवून गेले याचा तपास अधाप पर्यंत लागलेला नाही चौसाळा बायपासवरील या चोरटयाचा धुमाकूळ थांबणार का? असा प्रश्न या भागातील नागरिक विचारताना पाहावयास मिळत आहे आता स्थानिक गुन्हे शाखेनेच या चोरांचा बंदोबस्त करावा व चौसाळा बायपास चोरटयापासुन मुक्त करावा अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत.
