प्रतिनिधी: सतिश कडु
नागपूर, दि. 6 जून 2025 हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीला प्रतिबंध आणि त्यांच्या पुनर्वसनासाठीच्या अधिनियमाअंतर्गत नागपूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय सर्वेक्षण समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीत पदसिद्ध सदस्यांसोबत अशासकीय संघटना व समुदाय प्रतिनिधींची निवड करण्यात येणार आहे.
समितीसाठी अशासकीय संस्थांचे दोन प्रतिनिधी व समाजातील दोन प्रतिनिधी (किमान एक महिला आवश्यक) यांची नियुक्ती होणार आहे.
इच्छुकांना आवाहन
संबंधित कार्यात अनुभव असलेल्या आणि प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी आपले प्रस्ताव सादर करावेत.
प्रस्ताव पाठवण्याचे ठिकाण :
सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, विंग बी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर, श्रद्धानंदपेठ, नागपूर
(कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा)
