प्रतिनिधी : परशुराम मोरे.
धायरी (ता. हवेली) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त धायरी गावात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात धायरीतील महिला भजनी मंडळाच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. पूजनाचा मान महिलांना देण्यात आल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
या वेळी राजमाता जिजाऊ महिला महासंघाच्या अध्यक्षा सौ. स्मिता पोकळे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर नवनाथ रायकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास समूहाचे उपाध्यक्ष बाबासाहेब जोरे, अतुल पोकळे, संजय गवळी, बाळासाहेब अंबड, राहुल जाधव, हनुमंत कुंभार, रंगनाथ पोकळे, सनी रायकर, श्रीकांत पोकळे, रणजीत जोरे, तुषार कुंभार, शशिकांत पोकळे, सागर जाधव यांची उपस्थिती होती.
तसेच महिलांमध्ये सायली टिळेकर, ज्योती कुंभार, भाग्यश्री काळे, सोनाली पोकळे, गौरी कुंभार, प्रिया पातुरकर, वनिता पोकळे, छाया पोकळे, अश्विनी पोकळे, रूपाली रायकर, स्वाती जाधव, भारती पोकळे, राजश्री सांगळे, सुजाता डोळस, शितल गोळे, हिराबाई पोकळे यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रसेवा समूह, आणि राजमाता जिजाऊ महिला महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
