सुवर्ण भरारी बहुउद्देशीय संस्थेच्या बुलढाणा जिल्हा सरचिटणीस श्री रविकांत गजानन बावस्कर यांची नियुक्ती
प्रतिनिधी -सारंग महाजन.
अभिनंदनीय निवड
आम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, सुवर्ण भरारी बहुउद्देशीय संस्थेच्या श्री. रविकांत गजानन बावस्कर यांची बुलढाणा जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे!
श्री श्री श्री १००८ मंडलेश्वर श्री. दत्तात्रेय दहिवाळ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि डॉ. सारिका ताई नागरे, प्रदेशाध्यक्ष श्री. संदीप भाऊ मानकर, प्रदेश सरचिटणीस श्री. राजेंद्र कुलथे यांच्या आदेशानुसार, तसेच संपर्क प्रमुख श्री. संजय तळेकर आणि प्रदेश कार्याध्यक्ष श्री. संतोष दादा सोनार यांच्या माहितीनुसार ही घोषणा करण्यात आली आहे.
श्री. रविकांत गजानन बावस्कर यांचे सामाजिक कार्य, समाजातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान, एकनिष्ठता आणि त्यांनी आजपर्यंत समाजासाठी केलेली कर्तव्यनिष्ठ कामगिरी लक्षात घेता, त्यांची ही निवड जाहीर करण्यात आली आहे. समाजातील त्यांची भक्कम पकड आणि निस्वार्थ सेवाभाव या निवडीचे प्रमुख कारण आहे.
या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल श्री. रविकांत गजानन बावस्कर यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील वाटचालीस सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
शुभेच्छुक:
* श्री. दत्तात्रेय दहीवाल महाराज
* श्री. दत्तात्रेय मैड साहेब
* श्री. संदीप मानकर साहेब
* श्री. श्रीराम भाऊ उज्जेंकर
* श्री. प्रशांत भाऊ टाक (प्रदेश प्रसिद्धी प्रमुख)
* श्री. विनोदजी पंधे (जिल्हाध्यक्ष, बुलढाणा)
* श्री. नारायण शिवाजी देशमुख (जिल्हा उपाध्यक्ष, बुलढाणा)
* सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
* व सर्व पदाधिकारी व सदस्य.
वंदे मातरम्
जय नरहरी महाराज
जय जिजाऊ जय शिवराय
जय रमाई जय भीम
