सोमनाथ घार्गे यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला..!! अहिल्यानगर जिल्ह्याचा दांडगा अनुभव
संभाजी पुरीगोसावी (अहिल्यानगर जिल्हा) प्रतिनिधी
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबई येथे पोलीस उप-आयुक्त पदी बदली झाली आहे, त्यांच्या जागी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती झाली असून. त्यांनी शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक म्हणून मावळते राकेश ओला यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे, सोमनाथ घार्गे यापूर्वी श्रीरामपूर येथे 2008 ते2009 या कालावधीत पोलीस उपाधीक्षक म्हणून काम केले होते त्यांचा कार्यकाळ त्यांनी दरोडा प्रतिबंधक पथकांचे नेतृत्व केले आणि पापड्या काळ्या टोळीचा पर्दाफाश करून गुन्हेगारीला आळा घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. घार्गे यांचा अनुभव आणि त्यांची गुन्हेगारी विरोधी रणनीती त्यामुळे ते अहिल्यानगरच्या पोलीस प्रशासनाची योग्य निवड मानली जात आहे. राकेश ओला यांनी ऑक्टोंबर 2022 मध्ये अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता, त्यांनीही आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले, जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करीत अनेक आरोपींना अटक केली खून,दरोडे यासारख्या गुन्हेगारीवर त्यांनी विशेषत लक्ष केंद्रित केले होते, त्यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, नूतन पोलीस अधीक्षक घार्गे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक नियुक्ती म्हणून अहिल्यानगरच्या पोलीस प्रशासनासाठी नव्या संधी आणि आव्हानांचा कालावधी ठरणार आहे त्यांचा अनुभवाचा फायदा ठेवणे आणि सामान्य नागरिकांना नियंत्रण ठेवणे आणि सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरणात प्रदान करणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे,*
