एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भाजपा जैन प्रकोष्ठकडून महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात

भाजपा जैन प्रकोष्ठकडून महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू
_____________________________
जैन समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार” — राजेश पांडे
______________________________
पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठच्यावतीने पुणे मर्चंट्स चेंबर येथे एक महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पक्षाची निवडणूक रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि जैन समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी “जैन कार्यकर्ता मेळावा” आयोजित करण्यात आला.

भाजपा प्रदेश महामंत्री श्री. राजेश पांडे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “जैन समाज भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर दृढ विश्वास ठेवतो आणि प्रत्येक निवडणुकीत भाजपसोबत खंबीरपणे उभा राहतो. हा विश्वास आणि पाठिंबा भविष्यातही कायम राहील, असा आमचा ठाम विश्वास आहे.”

विधानसभा निवडणुकीचा पाठोपाठ आता महानगरपालिकेवरही भाजपचा भगवा फडकवायच्या निर्धार प्रत्येक भाजपा कार्यकर्तेने करायचा आहे व त्यात आपण यशस्वी होणारच असा विश्वास माजी सभागृह नेता श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठने व्यापक निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी महानगरपालिका निहाय कोअर कमिट्या जाहीर करण्यात आल्या असून, प्रत्येक महापालिका क्षेत्रात जैन कार्यकर्त्यांची प्रभावी उपस्थिती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्या ची माहिती भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष श्री. संदीप भंडारी यांनी दिली, जैन समाज तन, मन आणि धनाने भाजपच्या पाठीशी उभा राहणार आहे. समाजाचे संघटन अधिक बळकट करत, महानगरपालिकांमध्ये भाजपा मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे संदीप भंडारी यांनी जाहीर केले.

नगरसेवक असताना प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा तसेच जैन समाजाचेही प्रश्न सोडवण्याचे सातत्याने यशस्वी प्रयत्न केलेले आहे व यापुढेही अशाच पद्धतीने कार्य करणार असल्याचे आश्वासन बालासाहेब ओसवाल वा प्रवीण चोरबोले यांनी दिले.

अठरा वर्षापासून सतत आनंद दर्शन युवा मंच, जैन कॉन्फरन्स, लायन्स क्लब, जैन सेना ,जीतो अशा विविध संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम व समाजसेवेचे कार्य करीत आलेलो आहे व एक युवकांचे मोठं संघटन उभे करण्यात मला यशही मिळालेला आहे व आता महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने पालिका सभागृहात एक वेगळा ठसा उमटवण्याचा मानस इच्छुक उमेदवार महेंद्र सुंदेचा (मुथ्था) – पुणे शहराध्यक्ष, भाजपा जैन प्रकोष्ठ यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी जैन समाजाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार असून, पुढील निवडणूक ही पक्षासाठी निर्णायक ठरेल, असे मत यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते श्री. संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी जैन समाजातून भाजपच्या वतीने इच्छुक असलेले उमेदवार प्रवीण चोरबोले, बाळासाहेब ओसवाल, महेंद्र सुंदेचा (मुथ्था) , भरत भुरट, आनंद छाजेड, अरविंद कोठारी, श्रीमल बेदमुथा, प्रतिक देसरडा, कुंतीलाल चोरडिया, राजकुमार बाफना यांचा परिचय उपस्थित त्यांना करून दिला.

याप्रसंगी मानसीताई देशपांडे, अविनाश शिळमकर, राजेंद्र भाटिया, बाळासाहेब धोका, रवी दुगड, अनिल नहार, मितेश नहाटा, कीर्ती राज दुगड, हरीश शहा ने उपस्थिततांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन जिनेन्द्र कावेडिया यांनी केले.

 

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश बोरा, अभिजीत शहा, विनोद सोळंकी, निमेश शहा, मयूर सरनोत, सौरभ धोका, राजेश सालेचा, आनंद गादिया, उमेदमल धोका, पंकज बाफना,श्रीमल बेदमुथा सुयोग शहा, उमेश पितानी, प्रकाश बाफना, मुकेश राजावत, प्रीतम जैन, मनीष जैन, देवेंद्र पारख, सचिन कोटेचा, पंकज बाफना, कमलेश बोथरा, अल्पेश घोगरी, कुणाल लुंकड, अजित चंगेडिया आदींनी प्रयत्न केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link