आज भंडारा येथे आदर्श चित्रपटगृहात फुले चित्रपट हाउसफुल.. हाउसफुल…हाउसफुल
ओबीसी सेवा संघ व डॉक्टर ग्रुप भंडारा मार्फत आज 400+ प्रेक्षकांसाठी फुले चित्रपटाचे खास स्क्रीनिंग करण्यात आले. 200 ओबीसी विद्यार्थी आणि 200 सामाजिक कार्यकर्त्यांनी हा चित्रपट बघितला. भंडारावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व दाखवून दिले की “फुले” दांपत्यांचा संघर्ष वाया जाणार नाही. फुलेंचे शिलेदार नुसतेच जागृत नसून आता मोठ्या संख्येने वाढले आहेत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा फुलेंना जाणणारे फुलेंचे शिलेदार नक्कीच पुढे घेऊन जातील
*याप्रसंगी “ओबीसी युवा अधिकार मंच” चे मुख्य संयोजक मा.उमेश कोर्राम व संपूर्ण आयोजन टीम तर्फे या भव्य आयोजनास सफल करण्यासाठी सहकार्य दिलेल्या सर्व मान्यवरांचे व समस्त भंडारावासीयांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक आभार मानले.
