कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी तुषार दोशी सातारचे नवे पोलीस अधीक्षक तर समीर शेख यांची मुंबईला बदली
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी
राज्यांत पोलीस दलातील जवळपास 22 पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदावरील बदल्या करण्यात आले आहेत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस दलात उपायुक्तपदी तर सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबईत पोलीस दलात उपायुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे, दरम्यान रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अचानक बदली करण्यात आल्याने भूवया उंचावल्या आहेत, त्यांची अहिल्यानगर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आले आहे तर पुणे पोलीस बल गट क्रमांक एक-1 मधील आँचल दलाल डुडी यांची रायगड पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, राज्यात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आले आहे… तर साताऱ्याचे समीर शेख हे गेल्या आगामी विधानसभा निवडणुकीपासून बदलीच्या चर्चेत होते, अखेर समीर शेख यांची मुंबईला बदली झाली आहे त्यांच्या रिक्त जागेवर पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे तुषार दोशी सातारचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत. तुषार दोशी यांनी मुंबई नागपूर जालना पुणे अशा विविध जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा दिली आहे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते,*
