महारुद्र वीट भट्टी प्लांट येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न
मातोश्री अन्नपूर्णा संस्थेच्या माध्यमातून तालुकाभर आरोग्य शिबिर घेणार – नरेश कांबळे
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
आज रोजी परतूर तालुक्यातील महारुद्र वीट भट्टी प्लांट येथे मातोश्री अन्नपूर्णा सेवाभावी संस्था परतूर, ग्रामीण रुग्णालय परतूर,आय.एस.आर.एस.डी. जालना, लिंक वर्कर स्कीम जालना,यांच्या संयुक्तं विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराकरिता महारुद्रचे संचालक सावता काळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.ज्ञानदेव नवल,जिल्हा पर्यवेक्षक राजेश गायकवाड, प्रकल्प संचालिका मंदाकिनी पडूळ, जिल्हा साधन व्यक्ती किशोर मुळे,विभागीय पर्यवेक्षक प्रशांत जाधव या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी आय.सी.टी.सी.चे समुपदेशक शिवहरी डोळे, प्रयोगशाळा टेक्निशियन श्रीकांत देशमुख, एन.सी.डी.च्या मनिषा निकाळजे, एनसीडी समुपदेशक शाम मोरे, समुपदेशक,आरकेएसके समुपदेशक अरूण धोत्रे, एचएलएलचे दिपक साळवे,महारुद्रचे सुनील ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिराचे नियोजन मातोश्री अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नरेश कांबळे यांनी केले होते.
यावेळी कामगारांनी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद दिला यावेळी ८३ कामगारांच्या सी.बी.सी., शुगर,बी.पी.,क्षयरोग, एच.आय.व्ही.तसेच रक्तातील इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या.
