वरफळच्या विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम
परतूर, प्रतिनिधी हनुमंतदवंडे
वरफळ येथील छ.शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी दहावीचा निकाल चांगला लागला असून विद्यालयाने आपली यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. इयता दहावी मधे विद्यालयाच्या मुक्ता अशोक गायकवाड या विद्यार्थ्यांनीने सर्वाधिक 88 टक्के गुण मिळवित विद्यालयातून पहिला, किरन नीतीन रूपनर याने 78.60 टक्के गुण मिळवून दुसरा तर श्रेया सुभाष कदम हिने 74.60 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.
तर बारावी मधेबीडवे प्रदिप कैलाशराव हिने 67.83 गुण घेऊन प्रथम,शर्मा श्रुती संजय 62.67 द्वीतीय तर तिथे ज्ञानेश्वर सोपान ह्याने 58.50 गुण घेतले
छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाने दहावी व बारावी चा परीक्षेचा निकाल घोषित केला. छ.शिवाजी मा विद्यालयाच्या एकूण 64 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.यामध्ये 54 उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरफळ येथील इयत्ता बारावी फेब्रुवारी व इयत्ता दहावी 2025 च्या परीक्षेत सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे *संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री तथा विद्यमान आमदार श्री. बबनराव लोणीकर साहेब, संस्थेचे सचिव श्री राहुल भैया लोणीकर साहेब* तसेच मुख्याध्यापक श्री सोळूंके सर व सर्व शिक्षक मंडळी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या
आमच्या छ.शिवाजी माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयात शिक्षण घेणारे जवळ पास सर्वच विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. यातील फार कमी विद्यार्थ्यांनी खासगी शिकवणी लावली असेल तर बहतांश वीद्यार्थी खासगी शिववण न लावता केवळ शाळेत दररोज उपस्थित राहून व शाळेने दिलेला अभ्यास नियमितपणे करून हे यश मिळविले आहे. – रामेश्वर सोंळूके मुख्याध्यापक.
