रात्री व दिवसा पादचा-यांना लुटणा-या टोळीच्या प्रमुखास त्याच्या साथीदाराना लष्कर पोलिसांनी केली अटक.
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
पुणे:लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत फिर्यादी हे दि.१५मे २०२५ रोजी सीटिशन ट्रेडिंग बँकेजवळ, साचापीर स्ट्रीट, कॅम्प, पुणे हे त्यांच्या मोबाईलवरील मेसेज पाहत पायी चालत जात असताना, दोन अनोळखी इसम हे त्यांच्याकडील अॅक्टिव्हा दुचाकी वरून पाठीमागुन येवुन, फिर्यादी यांना ढकलुन देवुन त्यांच्या हातातील वरील वर्णनाचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून, जबरदस्तीने हिसकावुन चोरून नेला, त्याबाबत फिर्यादी यांनी लष्कर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्यात आरोपीचा अधिनस्त अंमलदार यांच्यासोबत असे शोध घेत असताना पो.उप. निरिक्षक राहुल घाडगे व पो.उप. निरिक्षक शेखर मोकाटे यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली कि, सदर गुन्हा हा भवानी पेठ, मटण मार्केटजवळ राहणारे अनिकेत आरणे व त्याचे साथीदार नाव आयान पठाण, यांनी केला आहे. त्यानुसार त्यांनी आरोपींचा शोध घेत घटनास्थळाचे आजुबाजुचे परिसरातील सी सी टि व्ही फुटेज पडताळणी करून माहिती घेतली असता, सदर माहितीच्या आधारे भवानी पेठ, परिसरात जावुन आरोपींचा शोध घेत असताना सदर ठिकाणी नंबर नसलेल्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना लष्कर पोलिसांना आरोपी मिळुन आले, त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून नाव पत्ता विचारला असता, त्यांनी आपली नावे १) आयान फिरदोस पठाण, वय १८ वर्ष, रा. गोल्डन हाईट्स, दुसरा मजला, फ्लॅट क्र. २०२, सरकारी दवाखान्याजवळ, भवानीपेठ, पुणे २) अनिकेत दामु आरणे, वय २० वर्ष, रा. अण्णा भाऊ साठे वसाहत, भवानीपेठ, पुणे, अशी असल्याचे सांगितले असुन त्यांच्यासोबत एक विधीसंघर्षित बालक चोरी करत असल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले आहे, त्याप्रमाणे वरीलप्रमाणे आरोपींना लष्कर पोलीस स्टेशन पथकाकडुन अटक करण्यात आली असुन, आरोपींकडुन त्यांनी चोरी केलेले मोबाईल व गुन्हा करताना वापर केलेली नंबर प्लेट नसलेली होंडा अॅक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपींकडुन त्यांनी लष्कर व खडक पोलीस स्टेशन हद्दीत ठिक ठिकाणी पादचा-यांना लुटण्याचे प्रकार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगीरी ही मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परि.२, पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे श्री. दिपक निकम, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरिषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रदिप पवार, पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे, पो.उप. निरिक्षक शेखर मोकाटे यांचे नेतृत्वाखाली, तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश कदम, अतुल मेंगे, संदिप उकिरडे, सोमनाथ बनसोडे, सचिन मांजरे रमेश चौधर, सागर हराळ.. लोकेश कदम, अमोल कोडिलकर, यांनी केलेली आहे.
