अजित पवारांनी घेतली पुणे ग्रामीणच्या नूतन पोलीस अधीक्षकांची सदिंच्छा भेट कायदा आणि सुव्यवस्थाबाबत चर्चा
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी
पुणे ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी शनिवारी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुखांकडून पदभार स्वीकारला आहे. पुणे शहरांतील कामगिरीची दखल घेवुन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पोलिस अधीक्षक म्हणून ऑक्टोंबर मध्ये नियुक्ती झाली होती. मात्र पंकज देशमुख यांचा कार्यकाळ पूर्णता : न झाल्यामुळे गिल यांना थांबविण्यात आले होते. तर पंकज देशमुख यांची पदोन्नतीने पुणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवारांनी त्यांची सदिंच्छा भेट घेवुन पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत केले, यावेळी अजित पवारांनी नूतन पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत पुणे ग्रामीण विभागातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा केली. संदीप गिल हे अजितदादा पवारांच्या खास मर्जीतील अधिकारी असल्याचे बोलले जात आहे.
