TANCC कोर्स मूलुख फार्म हाउस, उरळी कांचन पुणे येथे संपन्न
प्रतिनिधी हंसराज पाटील पुणे
स्प्रिच्युअल गाइड डॉक्टर ज्योति मैंम यांच्या सानिध्या मध्ये मुलुख फार्म हाऊस, उरळी कांचन येथे दिनांक 03/05/25 ते 14/05/25 या कालावधीत 04 बॅचेस मध्ये Telepathic Animal, Nature Comunication Cource चे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये निसर्गाशी व प्राण्याशी संवाद साधने याचे बेसिक नौलेज प्रॅक्टिकल द्वारे करून दाखवण्यात आले.
सद्याच्या परिस्थितीला शहरीकरण वाढत चालले आहे. या मुळे बरीच वनक्षेत्र तोडून त्याचा वापर विकासाच्या नावाखाली, औद्योगिकरणासाठी, IT क्षेत्रासाठी, मानवी वसाहत निर्मिती साठी करण्यात येत आहे.
पण जी पूर्ण निसर्गाशी निगडित पशु, पक्षी, प्राणी, कीटक आहेत, त्यांचे हाल होताना आपण सर्वत्र पाहत आहोत. आज सर्वत्र मोठया प्रमाणात वनक्षेत्र, जंगल तोड दिसून येत आहे. त्या मुळे हींश्रक प्राणी प्राणी सुद्धा दिवसा व रात्री मानवी वस्त्यांनमध्ये शिरकाव करून लहान मुले, महिला, पुरुष, यांना आपले शिकार बनवत आहेत. कितीतरी गोधन रस्त्यावर चाऱ्याअभावी, पाण्याआभावी, निवाऱ्या आभावी फिरताना दिसत आहेत.
कुठेतरी मानवाने आपल्या हव्यासापोटी, आज निसर्गाच्या प्रत्येक घटकावर आघात केला आहे.
याचेच दुष्परिणाम म्हणून सर्वत्र प्राण्याचें हाल दिसून येत आहे. नदी, नाले, यावर आक्रमण करून त्यांची जागा मर्यादित केली गेली. म्हणूतरी, अवेळी पाऊस पडणे, पडला तरी भरपूर पडणे, पावसाळयामध्ये, सर्वत्र पूरसद्रश्य परिस्थिती निर्माण होते. मग त्या वेळी आपणाला किती त्रास होतो याची जाणीव होते.
आजच्या घडीला प्रत्येकाने मिळेल त्या वेळेला निसर्गाशी जवळीक साधली पाहिजे. मग ती छोटी, रोपटी असू देत झाडे असू देत.
कीटक, पशु, पक्षी, प्राणी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणे, त्यांना होईल तेवढी मदत करता आली तर करणे, ती पण आपणाशी संवाद साधतात, निसर्गाची व प्राण्यांची भाषा आपणाला शिकता आली पाहिजे. जर आपल्यात आत्मीयता असेल, आवड असेल तर ती भाषा आपण शिकू शकतो संवाद साधू शकतो.
डॉक्टर ज्योती म्यॅम यांच्या सानिद्यात व त्यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील शेकडो निसर्ग व प्राणी प्रेमी यांनी संवाद साधनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. संवाद साधला. या मध्ये खूप वेगळा आनंद घेता आला.
आज शासनाकडे आमची विनंती आहे. कि अश्या कोर्सेस ला प्राधान्य दयावे व सध्याच्या युवा जनरेशन ला निसर्ग व प्राणी प्रेमी बनवन्यासाठी प्रयत्न करावे. अशी पिढी पुढे तणाव विरहित जीवन जगू शकते. हि काळाची गरज सुद्धा आहे.
या कोर्ससाठी विशेष सहकार्य अशोक देशमुख सर यांचे लाभले.
आलेल्या सर्व मेंबर्स ने डॉक्टर ज्योती म्यॅम चे विशेष आभार मानले… तसेच
निसर्ग व प्राण्यासाठी सतत कार्यरत राहून सेवा देण्यासाठी तत्पर राहणार असे सांगितले…
