सह्याद्रीला विचारा आपला शंभूराजा कसा होता – साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
वारजे – छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पै. आप्पासाहेब आखाडे यांच्यावतीने धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला..
*या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मोफत आरोग्य शिबिर मोफत नेत्र तपासणी मिरवणूक सोहळा महाआरती किर्तन सोहळा व महाप्रसादाचे नियोजन छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते…*
*गेली अनेक वर्ष छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन आपण करतो यावेळी मात्र युद्ध विजय सैनिक रक्षणार्थ महायज्ञ भारतीय सैन्य दलाच्या संरक्षणासाठी आणि हिंदुस्थानाच्या विजयासाठी अखंड 72 तास महायज्ञाचे आयोजन केले असे मत आयोजक पै. आप्पासाहेब आखाडे राष्ट्रीय अध्यक्ष छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य मोरया मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष यांनी व्यक्त केले..*
*या महाआरतीचे अहोभाग्य श्री महंत डॉ.श्रीकांत दास धुमाळ महाराज पै. आप्पासाहेब आखाडे राष्ट्रीय अध्यक्ष छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य व शिवभक्त साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत ( शिवबांचा छावा ) महा. प्रदेश प्रवक्ता अखिल भारतीय छावा संघटना यांना लाभले…*
*ज्या छत्रपती शंभूराजांनी आपले बलिदान दिले आपल्या सर्वस्वाचा त्याग केला 40 दिवस अतोनात यातना सहन केल्या या सर्व गोष्टींचा विचार करून कमीत कमी आपण त्या छत्रपतीं शंभू राजांचा वारसा टिकवण्याचं काम या मावळ्यांनी करणे गरजेचे आहे छत्रपती शिवरायांच्या आचार व छत्रपती शंभुराजांचे विचार आत्मसात करणं ही काळाची गरज आहे असं मत यावेळी शिवभक्त साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत यांनी व्यक्त केले..*
*या कार्यक्रमाला नवनाथांना चव्हाण, प्रदीप वांजळे, नवनाथ सोनार, अजय धनवडे, आकाश केदारे, अनिल वांजळे शिवभक्त शिवाजी पाटील व अनेक शंभू भक्त उपस्थित होते…*
