खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींच्या दोन तासांत कोंढवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
कोंढवा पोलिसांची दमदार कामगिरी
संभाजी पुरीगोसावी (पुणे शहर ) प्रतिनिधी. कोंढवा पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये दि. 11/05/ 2025 रोजी कोंढवा पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून ज्योती हॉटेल समोर मोकळ्या जागेत एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांना मिळाली लगेच त्यांनी घटनास्थळी पोलीस निरीक्षक (गुन्हे ) रऊफ शेख पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप तपासी पथकांचे सपोनि पोलीस निरीक्षक राकेश जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले, पोलिसांनी घटनास्थळावर पाहणी केली असता माहितीसामाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे समोर आले, त्याच्या ओळखपत्रावरून त्याचे नाव सुभाष रघुवीर परदेशी (वय 54 ) रा. गोकुळनगर गल्ली नंबर 03 कोंढवा बुद्रुक) पुणे असे दिसून आले, मात्र पोलिसांनी त्याच्या पत्नीशी संपर्क साधून ते मित्राबरोबर गेल्याचे समोर आले, त्यानंतर पोलिसांनी मात्र वेगाने तपासाला गती दिली, यावेळी तपास पथकांतील पोलिस अंमलदार विशाल मेमाणे यांच्या खबऱ्यामार्फत अधिक माहिती घेतली असता अखेर कोंढवा पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले ते खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, अभय जगन्नाथ कदम (वय 24) रा. तालीम चौक भैरवनाथ आळी कोंढवा खुर्द बादल शाम शेरकर (वय 24 ) रा. सर्वे नंबर 354 बघे चाळ भैरवनाथ मंदिरांमागे कोंढवा ) पुणे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच पाच लाख रुपये हात उसने घेतले होते, तो पैसे परत देत नसल्याच्या रागांतून खून केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले, सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार मनोज पाटील पूर्व प्रादेशिक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) रऊफ शेख पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप तपास पथकांचे स.पो.नि. विशाल मेमाणे निलेश देसाई गोरखनाथ चिनके सतीश चव्हाण लक्ष्मण होळकर सुजित मदने संतोष बनसुडे सैफ पठाण अभिजीत जाधव अभिजीत रत्नपारखी आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला
