प्रतिनिधी -सारंग महाजन | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
रुशिकेश कुमारे यांचे ‘Silent Affections – A Journey of Unspoken Love’ हे पहिले पुस्तक नुकतेच 11 मे ला प्रकाशित झाले असून वाचकांच्या पसंतीस उतरते आहे.
रुशिकेश कुमारे हे मूळचे पुण्यातील असून लेखक, दिग्दर्शक, डिझायनर आणि ForReal Studios चे सहसंस्थापक आहेत. विविध कलात्मक प्रकल्पांत सहभाग घेतलेला असून, भावनिक अभिव्यक्तीसाठी लेखन हे माध्यम त्यांनी निवडलं. Silent Affections हे त्यांचं पहिले पुस्तक असून, यात एक प्रेम कथा आहे — ज्या प्रेम, स्वतःशी नातं आणि न बोलता राहिलेल्या भावनांभोवती फिरतात.
या पुस्तकात एक सुस्पष्ट भावनिक प्रवास दाखवला आहे जिथे प्रेम व्यक्त होतं, पण शब्दांशिवाय. प्रत्येक कविता आणि कथा वाचकाच्या हृदयाला भिडते. “हे पुस्तक त्या सगळ्यांसाठी आहे, ज्यांनी कधी प्रेम अनुभवलं पण बोलून दाखवू शकले नाही,” असं रुशिकेश म्हणतात.
हे पुस्तक Writers Pocket या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित झालं असून आता प्रमुख ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.
