प्रतिनिधी सारंग महाजन .अहिल्यानगर – राज्य परीक्षा परिषद आयोजित इ.५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत छावणी परिषदेच्या पीएमश्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेने यश संपादन केले. या शिष्यवृत्ती गुणवंतांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनतर्फे छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे व स्नेहबंधचे
संस्थापक डॉ. उद्धव शिंदे यांनी प्रमाणपत्र, पदक व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इ.५ वीच्या विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षा, राज्यस्तरीय लक्ष्यवेध परीक्षा, राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षा, हिंदसेवा टॅलेंट सर्च अशा ५ वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सहभाग घेतला होता. प्रसाद अशोक शेलार याने प्रत्येक परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. इ.६ वीतील आयुष घोरपडे याने लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. इ.८ वीतील विद्यार्थिनी अर्शीन सय्यद, साक्षी वाघमारे, क्रांती मोरे हे एनएमएसएस उत्तीर्ण झाल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे म्हणाले, शालेय जीवनातील या स्पर्धा परीक्षा भविष्यकाळातील एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यापुढे असेच परिश्रम घेत रहा, आपल्या सुद्धा अधिकारी बनण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.
पीएम श्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेतील या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र, पदक, गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे, यशस्वी विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे सुभाष भारूड, सीमा चोभे, एस.जे.लबडे व स्नेहल लवांडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश मोहिते यांनी, तर आभार संजय हजारे यांनी मानले
शिष्यवृत्ती परीक्षेत यांनी मिळवले यश
प्रसाद अशोक शेलार २४४, स्नेहल काळू हिले २०४, कल्याणी निशांत नन्नवरे १६८, ईश्वरी रवि नन्नवरे १५८, श्रावणी संदिप साबळे १५०, अभिमन्यू गोरखे १५०, सार्थक सचिन कुरुमकर १४२ तसेच इ.८ वीच्या क्रांती सचिन मोरे हिने १५४ गुण प्राप्त करून यश मिळवले.
(फोटो ओळ)
‘स्नेहबंध’ तर्फे छावणी शिष्यवृत्ती गुणवंतांचा सत्कार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे व स्नेहबंधचे डॉ. उद्धव शिंदे यांनी प्रमाणपत्र, पदक व गुलाबपुष्प देऊन केला. यावेळी मुख्याध्यापक संजय शिंदे, सुभाष भारूड, सीमा चोभे, एस.जे.लबडे व स्नेहल लवांडे आदी.
