चैन-स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपीस केली अटक
संपादक: संतोष लांडे
पुणे:दि.०१मे २०२५ रोजी चैन स्नॅचिंग पथकातील अधिकारी सपोनि बेरड व अंमलदार असे नांदेड सिटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं ४९/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना चैन स्नॅचिंग पथकातील अंमलदार यांनी तसेच तांत्रिक विश्लेषण करुन व मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे सदरचा गुन्हा हा तेजस वायदंडे, रा. चिंचवड गाव, पुणे याने केल्याचे समजले.चैन-स्नॅचिंग पथकातील अधिकारी व अंमलदार हे त्याचा शोध घेत असताना तो वैदवाडी, हडपसर, पुणे येथे मोटार सायकलसह उभा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता तेजस वायदंडे हा वैदवाडी, हडपसर, पुणे येथे मिळुन आल्याने स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता १) तेजस नितिन वायदंडे, वय २२ वर्षे, रा. चाफेकर चौक, चिंचवड गाव, शिवसेना ऑफिस, बि.नं. ७, रुम नं ७०७, मोरया हौसिंग सोसायटी, पुणे, मुळगाव- लासुर्णे, जि. सातारा असे असल्याचे सांगितले. त्यास अधिक विश्वासात घेवुन तपास केला असता सदरचा गुन्हा त्याने केल्याची कबुली दिली.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे रेकॉर्डवरील गुन्हेगार नाव तेजस नितिन वायदंडे याने सदरचे मंगळसुत्र हे त्याचे ओळखीचे मित्र आरोपी क्रं. २) वैभव राजेश कांबळे, वय २७ वर्षे, रा. शास्त्रीनगर, डिलक्स फॉर्च्यून मॉल, गोपाळ प्रोव्हिजन स्टोअर्स जवळ, पिंपरी पुणे याचे करवी ३) राचिन मल्लिकार्जुन स्वामी, वय २७ वर्षे, रा. फ्लॅट नं १०५, पहिला मजला, साई कॉम्प्लेक्स, नखाते वस्ती, रहाटणी, पिंपरी, पुणे यास देवुन त्याने ते त्याचे ओळखीचे ज्वेलर्स यांचेकडे दिलेबाबत सांगितले.
तसेच याचे अंगझडतीत एक सोन्याची अंगठी मिळून आली. सदखाबत निगडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड येथे गुन्हा नोंद आहे.
वरील नमुद आरोपी याचेकडुन खालील नमुद पोलीस स्टेशन कडील गुन्हे उघडकीस आणले आहेत. १) नांदेड सिटी पोलीस स्टेशन, पुणे शहर, गुन्हा रजि नं ४९/२०२५, भा.न्या.स. कलम ३०९ (४) २) निगडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड, गुन्हा रजि नं १३१/२०२५, भा. न्या. सं. कलम ३०९(४)
असे एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणले आणले असुन २,२०,०००/- रु किं चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच वरील नमुद आरोपींना पुढील कारवाई करीता नांदेड सिटी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजन शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, सहा. पोलीस निरीक्षक सी.बी.बेरड व पोलीस अंमलदार नाळे, साळवे, डापसे, राहुल इंगळे, बंटी सासवडकर, तनपुरे, गणेश ढगे, इरफान पठाण, अजित शिंदे, अमित गद्रे, गणेश गोसावी, मनोज खरपुडे यांनी केली आहे.
