अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू
माननीय रेल्वेमंत्र्यांनी पुणे (हडपसर) – जोधपुर एक्सप्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल – जोधपुर (भगत की कोठी) एक्सप्रेसच्या उद्घाटन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला
माननीय श्री अश्विनी वैष्णव, रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी पुणे (हडपसर) – जोधपुर एक्सप्रेसच्या उद्घाटन विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला तसेच एमजीआर चेन्नई सेंट्रल – जोधपुर (भगत की कोठी) एक्सप्रेस उद्घाटन विशेष ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिनांक ३.५.२०२५ रोजी पुणे रेल्वे स्टेशन येथून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी माननीय केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ, माननीय खासदार श्रीमती मेधा कुलकर्णी आणि माननीय आमदार श्री सुनील कांबळे उपस्थित होते.
श्री गजेंद्र सिंह शेखावत, माननीय केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन राज्यमंत्री; कु वनिता सेठ, माननीय महापौर, जोधपुर; माननीय खासदार श्री राजेंद्र गहलोत व श्री लुंबाराम चौधरी; माननीय आमदार श्री अतुल भन्साळी व श्री देवेंद्र जोशी हे या प्रसंगी जोधपुर रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.
डॉ. एल. मुरुगन, माननीय केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या समारंभात सामील झाले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धर्म वीर मीना यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि या नवीन रेल्वे सेवांबद्दल माहिती दिली.
नवीन गाड्यांचे फायदे:
१. महाराष्ट्र/तामिळनाडू आणि राजस्थान दरम्यान थेट प्रवास
२. व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात वाढ, पर्यटन सुलभ होईल.
३. प्रदेशांमधील व्यापार आणि व्यावसायिक संपर्काला प्रोत्साहन मिळेल.
४. प्रवाशांचा, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा वेळ आणि त्रास वाचेल.
५. सांस्कृतिक संबंधांना चालना मिळेल आणि प्रादेशिक एकात्मता वाढेल.
हडपसर (पुणे) – जोधपुर एक्सप्रेसच्या उद्घाटन
विशेष ट्रेनचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
उद्घाटन ट्रेन क्रमांक 01401 हडपसर (पुणे) – जोधपुर एक्सप्रेस पुणे येथून दिनांक ०३.०५.२०२५ रोजी १७:३० वाजता सुटेल आणि जोधपुर येथे दुसऱ्या दिवशी १४:०० वाजता पोहोचेल.
*हडपसर आणि जोधपुर दरम्यानच्या नियमित रेल्वे सेवांची माहिती खालीलप्रमाणे आहे:*
ट्रेन क्रमांक 20496 हडपसर – जोधपुर एक्सप्रेस दिनांक ६.५.२०२५ पासून हडपसर येथून दररोज १९.१५ वाजता सुटेल आणि जोधपुर येथे दुसऱ्या दिवशी १५:१० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 20495 जोधपुर – हडपसर एक्सप्रेस दिनांक ५.०५.२०२५ पासून जोधपुर येथून दररोज २२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७:१० वाजता हडपसर येथे पोहोचेल.
*नियमित गाड्यांचे थांबे:* पुणे, चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा, गेरतपूर, अहमदाबाद, महेसाणा, पालनपुर, आबू रोड, पिण्डवाड़ा, जवाई बॉंध, फालना, राणी, मारवाड जंक्शन, पाली मारवाड़ आणि लूनी.
*नियमित गाडीमधील संरचना* : दोन द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, २ तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनररेटर व्हॅन.
*आरक्षण* : नियमित गाडी क्रमांक 20496 चे बुकिंग दिनांक ५.५.२०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
