संभाजी पुरीगोसावी (वर्धा जिल्हा).
उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय हिंगणघाट यांचा पथकांला पो.स्टे. हिंगणघाट हद्दीत दारू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे, सदरची कारवाई ही पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने एक चार चाकी टाटा एस कंपनीची गाडी क्र MH 32 Q 221 पिवळ्सर रंगाची ही विदेशी दारूची मौजा नागरी ता:वरोरा जि चंद्रपूर कडून मौजा हिंगणघाट कडे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्या पथकांने सदर ठिकाणी जावुन नाकाबंदी केली असता एक चार चाकी टाटा एस कंपनीची गाडी क्र MH 32 Q 221 पिवळ्सर रंगाची ही येतांना दिसली पोलिसांनी सदर गाडी थांबवली असता संशय जास्त बाळगल्याने अखेर पोलिसांनी सदर गाडीची तपासणी केली. यावेळी गाडीच्या केबिनमध्येच अवैध देशी दारू बियरचे बॉक्स आढळून आले पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये आरोपी नामे आमिर राशिद खान पठाण (रा. निशानपुरा वॉर्ड ,हिंगणघाट) , 2) शुभम गजानन तोडासे (रा. निशानपुरा वॉर्ड ,हिंगणघाट ) असे सांगितले व सदर गाडीची पोलीसांनी तपासणी केली असता गाडीच्या केबिन मध्ये 5 खर्डाच्या खोक्यात रॉयल स्टॅग कंपनी च्या विदेशी दारू चा माल कि 72,000/ व 1 कार्ल्सबर्ग कंपनीची विदेशी दारू बियर चा खर्डा कि 7200/ व गाडी कि 200000 / असा एकुण जु.किं. 2,79,200/- रुपयांचा मुद्देमाल माल मिळुन आल्याने आरोपींविरोधात पोलीस स्टेशन, हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि प्रेमराज अवचट पो.हवा. अश्विन सुखदेवे पो. हवा. उमेश लडके, ना.पो.शि रवींद्र घाटुर्ले पो. शी.भारत बुटलेकर यांच्या पथकांने केली.








