अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पाचोरा येथील रांगोळी कलाकार शैलेश कुलकर्णी यांच्या निवास स्थानी थेट शिक्षक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांची विशेष भेट.
प्रतिनिधी -सारंग महाजन.
नुकतेच मी पंढरपूर येथे झालेल्या शिक्षक संमेलनात शिक्षक पदवीधर आमदार नाशिक मतदार संघ यांचे रांगोळीत व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक सादर केले होते .पण काही वैयक्तिक कारणास्तव सत्यजित तांबे सर त्या ठिकाणी येऊ शकले नव्हते..पण त्यांनी मला कॉल करून शब्द दिला होता..की मी जेव्हा कधी पाचोरा येईल तेव्हा तुला नक्की भेटेन.
आणि आश्चर्य म्हणजे. दिनांक २६ एप्रिल रोजी एका निनावी नंबर वरून कॉल आला आणि उद्या सत्यजित तांबे दादा पाचोरा येथे एका कार्यक्रमास येत असून ते तुमच्याकडे भेट देतील असे सांगितले. परंतु,आज दिनांक २७ एप्रिल रोजी सत्यजित तांबे दादा चक्क सकाळी १० वाजता शैलेश कुलकर्णी यांच्या घरी (कला छंद ड्रॉइंग व रांगोळी क्लास ) पाचोरा येथे रांगोळी प्रती प्रेम दर्शविताना भेट दिली . सर्व विद्यार्थ्यांशी मनमोकळे पणाने गप्पा केल्या. कलेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दादांच्या प्रेमळ आणि आपुलकीच्या भावनेने सर्व भारावून गेलो. एका साधारण घरातील कलाकारास दादांनी दिलेली भेट यांच्या मेहनतीचे , प्रामाणिक भावनेने काम करत असल्याचे , विद्यार्थ्या मागील घेत असलेल्या मेहनतीचे , आई वडिलांचे आशिर्वादाचे फळ असल्याचे शैलेश कुलकर्णी यांनी सांगितले सर्वांना अजून कलेप्रती काम करण्यास प्रेरणा देईल.
