अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
टिंगरे नगर पुणे येथील मनसे कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
प्रतिनीधी शंकर जोग
वडगाव शेरी, टिंगरे नगर येथील मनसे कार्यकर्ते श्याम ताटे, राहुल भोसले, संतोष खराबे, ऋतिक विधाटे, प्रणव महाडिक, सौरभ ताटे, महेश सूर्यवंशी, वैजनाथ शिंदे, आणि येरवडा भागातील सामाजिक कार्यकर्ता राहुल ढाकरे यांचा पुणे येथील शिवसेना भवनामध्ये महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले,
महाराष्ट्र विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती डॉ नीलम गोरे, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला,
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, बांधकाम सेना जिल्हाप्रमुख संतोष राजपूत, शिरूर महिला आघाडी संपर्कप्रमुख सारिका पवार, आदि यावेळी उपस्थित होते शिवसेना पुणे शहर समन्वयक शंकर संगम यांच्या प्रयत्नातून हा प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला,
