राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची पश्चीम महाराष्ट्र आढावा बैठक पुणे येथे संपन्न
प्रतिनिधी:हंसराज पाटील
पुणे (कात्रज) : आज दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी कात्रज येथे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक घेण्यात आली असता. बैठकीस राष्ट्रीय युवा ग्रामिण पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष. मा. श्री. गणेश कचकलवार. हे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शन खाली आढावा व नवीन पदाधिकारी नियुक्ती पत्र देवून शाल श्रीफळ देवून तर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकारी यांना गौरवण्यात आले व ज्यांनी छान कार्य केले आहे त्यांना पदोन्नती देण्यात आली व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. गणेश महाडिक. याचे देखिल मोलाचे मार्गदर्शन पदाधिकारी यांना लाभले तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख श्री. कांताभाऊ राठोड. व पश्चिम महाराष्ट्र. विभाग सचिव श्री. संतोष लांडे. तसेच महिला प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताई घोडके.हवेली तालुका अध्यक्ष श्री .सतीश कुमार कोकरे. हवेली तालुका उपाध्यक्ष श्री. अमित मोरे . श्री गणेश राऊत. पुणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भालेराव व. श्री. परशुराम मोरे.श्री लक्ष्मण खैराटे. श्री. किरण सोनवणे. श्री. आदित्य चव्हाण. श्री. परमेश्वर कदम सर्व पत्रकार.व आदी मान्यवर उपस्थित होते.आढावा बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली व आलेल्या प्रमुख पाहुणे त्यांना शाल श्रीफळ . पुष्पगुछ. देऊन प्रमुख मान्यवरांच्या सत्कार करुण टाळयांच्या गजरा मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी मनोगत व्यक्त करताना. श्री. गणेश कचकलवार युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रिय अध्यक्ष यांनी कुठल्याही पत्रकारावर अन्याय झाल्यास आम्ही व आपले पदाधिकारी नेहमी सोबत आहोत फक्तं आपण योग्य दिशेने कार्य करावं असं सांगीतले व सर्वांचे मनोगत ऐकुन नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
