पहलगाम, जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने
प्रतिनिधी सतीश कडू
आज रोजी परिमंडळ चार अंतर्गत सर्व धर्मीय धर्मगुरू यांची डीसीपी झोन 4 रश्मीता राव यांनी परिमंडळ कार्यालयात मिटींग आयोजित केली होती. सदर मीटिंग करिता सर्व धर्माचे एकूण 41 धर्मगुरू हजर होते. तसेच परिमंडळातील बेलतरोडी, अजनी, हुडकेश्वर, इमामवाडा, वाठोडा, नंदनवन या पोलीस स्टेशनचे ठाणेदार, तसेच ACP अजनी श्री नरेंद्र हिवरे हजर होते. सदर मीटिंगमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी निषेध व्यक्त केला. विविध धर्माच्या धर्मगुरू यांनी आपले विचार मांडले तसेच ACP नरेंद्र हिवरे, व DCP रश्मीता राव यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये सर्वांनी जातीय सलोखा ठेवावा, जातीय तेढ निर्माण होणार नाही अशी कोणतीही कृती करू नये, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नये , विनापरवानगीने कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नये याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या.
