जेबापिंप्री येथे वीज पडून म्हैस ठार
—–
(बीड जिल्हा) चौसाळा, प्रतिनिधी.
दिनांक २६ येथून जवळच असलेल्या जेबापिंप्री येथे शनिवार (दि. २६) रोजी दुपारी तीनच्या सुमारांस ढगाळ वातावरण झाले होते. अचानक वादळी वारा सुटला आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. जेबापिंप्री येथील शेतकरी शहाजी नवनाथ कागदे यांच्या गट नंबर १७३ मध्ये गोठ्याजवळ बांधलेली मुरा जातीची म्हैस ही वीज पडून जागीच ठार झाली. सदर घटना समजल्यानंतर शेतकरी यांनी संबंधित तलाठी मंडळ अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांना दूरध्वनी द्वारे सदर घटनेची माहिती दिली असून अद्याप पर्यंत सदरील घटनेचा पंचनामा व शवविच्छेदन झालेले नाही. सदरील घटना घडल्यामुळे शेतकरी शहाजी नवनाथ कागदे यांच्यावर संकट ओढावले आहे.
महसूल विभागाने सदरील घटनेचा तात्काळ पंचनामा करावा व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून अहवाल द्यावा जेणेकरून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल. पवन कुचेकर
भाजपा अनुसुचित जाती मोर्चा बीड तालुकाध्यक्ष
