रास्तळ येथे निरोप सभारंभ संपन्न
भारज प्रतिनिधी राजेश दामधर
जालना जिल्हातील जाफ्राबाद तालुक्यातील येथील
प्रा शाळा रास्तळ येथे त्रिवेणी कार्यक्रम घेण्यात आला. यात वर्ग 7 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ, वर्ग 1 ली च्या नवागताचे स्वागत प्रवेशोत्सव व कलादर्पण या सां.कार्यक्रमाचे सर्व विद्यार्थ्यांना भेट वितरण अशा तीन कार्यक्रमाचा त्रिवेणी संगम साधण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती आम्रपाली दीपक साळवे अध्यक्ष शा. व्य. समिती यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष श्रीमती संगीताताई भागवत जाधव, सर्वश्री.प्रमोद जाधव, सचिन लेंडे, सुरेशभाऊ जाधव सदस्य हे होते. या कार्यक्रमात वर्ग 1 ली च्या प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. वर्ग 7 वी च्या विद्यार्थ्यांना भावी उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सर्व विद्यार्थ्यांना कलादर्पण सा. कार्यक्रमानिमित्त परीक्षा pad ही भेटवस्तू देण्यात आली. शिक्षिका द्वय श्रीमती मीना काकडे व रजिया शेख मॅडम यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट पोहे व शिरा यांचा अल्पोहार देण्यात आला. कार्यक्रमास श्रीमती सुनीताबाई जाधव अंगणवाडी सेविका व मंगला कदम, श्री. मोहन शेडगे व रुख्मिणी शेडगे यांनी मोलाचे सहकार्य केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.पी. डी. अंबेकर यांनी केले.
