युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या भुसावळ तालुका सचिव पदी गोपाळ कळसकर यांची निवड
पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
भुसावळ ( जळगाव) : युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या भुसावळ तालुका कार्यकारिणीत सचिव पदी नुकतीच गोपाळ कळसकर यांची निवड करण्यात आल्याचे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी कळवले आहे. गोपाळ कळसकर हे गेल्या चार वर्षांपासून दैनिक बाळकडू ,अधिकारनामा,सारथी महाराष्ट्राचा ,तेजोमय न्युज इ.वृत्तपत्रात कार्यरत आहेत.
झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी आहेत.
युवा ग्रामीण पत्रकार संघ ही पत्रकारांच्या न्याय, हक्क व संरक्षणासाठी लढणारी भारतातील आग्रही चळवळ व संघटना आहे. संपूर्ण भारतभर संघटनेचे कार्य आहे. अतिशय कमी वेळात आपल्या कार्यामुळे ही संघटना नावारूपाला आलेली असून संघटनेत बरेच पत्रकार या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
संघटनेत भुसावळ तालुका कार्यकारिणीत सचिव पदी निवड झालेले गोपाळ कळसकर यांनी आपण युवा ग्रामीण पत्रकार संघटनेने दिलेली जबाबदारी योग्य कार्यक्षमतेने पार पाडू व संघटनेची प्रतिष्ठा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश कचकलवार व कांताभाऊ राठोड पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.गोपाळ कळसकर यांच्या या निवडीबद्दल पत्रकारिता क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
