श्री धनराज उपाडे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित .
प्रतिनिधी- सारंग महाजन.
महाराष्ट्राची ओळख म्हणजे पराक्रम, कर्तृत्व आणि सेवाभावी वृत्ती! इथल्या मातीत जन्मलेली माणसं फक्त स्वतःच्या यशापुरती झटत नाहीत, तर समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपले जीवन समर्पित करतात.
त्यात एक कर्तृत्वान व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते श्री धनराज उपाडे *महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित*.
युवा महाराष्ट्र फौंडेशन आयोजित विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान सोहळा दि 23 एप्रिल 2025 रोजी पुणे येथे पार पडला. यामध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचे सचिव श्री धनराज उपाडे यांना समाजातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल व घेतलेले अथक परीश्रम याची दखल घेऊन महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाज कार्यक्षेत्रातील आपले योगदान भविष्यात आणखी प्रभावी होईल याची खात्री आहे. त्याबद्दल श्री उपाडे यांचे सर्व स्तरातुन व मित्रमंडळीकडून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
