रविंद्र पाटील (नाशिक जिल्हा प्रतिनिधी) नाशिक, 22 एप्रिल 2025: यशवंत मंगल कार्यालयात एक वेगळाच सोहळा अनुभवायला मिळाला – इथे ना फक्त पुरस्कार वाटले गेले, तर प्रेरणा पेरली गेली! अंध, मेंटली हँडीकॅप असलेल्या मुलांच्या आईंना आणि त्यांच्यासोबत सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या शिक्षिका, केअरटेकर यांना मिळालेल्या ‘नारीरत्न पुरस्कारांनी’ साऱ्या वातावरणात एक स्फूर्तिदायी जिवंतपणा भरला!
या सन्मानाचा केंद्रबिंदू होता ‘अशक्याला शक्य करणाऱ्या’ मातांचा संघर्ष. मुलं विशेष आहेत, पण त्यांचं आयुष्य घडवणाऱ्या या मातेचं सामर्थ्य हेच खरं नारीरत्न ठरलं!
या भव्य आणि सामाजिक जाणीवांनी भारलेल्या सोहळ्याचे सूत्रसंचालन सुशमा परांजपे यांनी हृदयस्पर्शी शैलीत केलं. प्रमुख पाहुण्यांमध्ये मा. सभापती गणेश गिते, डाॅ. भाग्येश मंत्री, रील्स स्टार साहील अन्सारी आणि खाजगी कोचिंग क्लासेस संघटनाचे किशोर सपकाळे.( उपाध्यक्ष PCCDA),खजिनदार रविंद्र पाटील सर यांचा गौरवशाली सहभाग होता.
*या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन श्रमिक बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष वैशाली सपकाळे व ‘यश क्लासेस’ चे संस्थापक अध्यक्ष किशोर सपकाळे यांच्या सहकार्याने शक्य झालं. कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर चैत्राली परांजपे, नुपुर सपकाळे आणि मैथली सपकाळे या विद्यार्थिनींनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाच्या शेवटी, संपूर्ण सभागृहात “नारी तू नारायणी” हे शब्द जणू प्रत्यक्ष प्रकट झाले!
