ठाकरे बंधू महाराष्ट्रातील जनता तुम्ही एकत्र येण्याची आतुरतेने वाट पहात आहे.
प्रतिनिधी:- दौलत सरवणकर
ठाकरे बंधू महाराष्ट्रातील जनता तुम्ही एकत्र येण्याची आतुरतेने वाट पहात आहे तुम्ही एकत्र याल तो दिवस महाराष्ट्रासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा दिवस असेल. दोघांनी एकत्र आलच पाहिजे ही काळाची गरजच आहे, मराठी माणसासाठी, मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी व महाराष्ट्रात चाललेल्या गचाळ व नीच , गलिच्छ राजकारणासाठी….
नुसत्या बातमीने बघा सर्व सामान्यातल्या सामान्य माणसाला किती आनंद झालाय, आणि जेव्हा हे सत्यात उतरेल तेव्हा तर काय होईल हा विचार करा फक्त… श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने दोन्ही ठाकरे बंधू नक्कीच एकत्र येतील.माझी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो लवकरच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे.
