केडगाव मध्ये भीम जयंती मोठ्या उस्ताहात साजरी
पुणे प्रतिनिधी : गोपाळ भालेराव
दौंड तालुक्यातील केडगाव मध्ये भीम जयंतीच आयोजन करण्यात आले होते या भीम जयंतीमध्ये भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती केडगाव मधील भीम जयंतीच आयोजन रोहित दादा गजरमल व भीम क्रांती मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात येते भीम क्रांती मित्र मंडळाचे तिसरे वर्ष होते या भीम जयंतीची सुरुवात सकाळी 10 ते 12 यावेळेत रॅली काढण्यात आली होती त्यानंतर तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संध्याकाळी ठीक सहा वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते ही मिरवणूक केडगाव रेल्वे स्टेशन पासून ते केडगाव ग्रामपंचायत पर्यंत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूक मध्ये दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी सहभाग घेऊन त्यांनी सुधा dj च्या तालावर ठेका धरत भीम जयंतीचा मनोसक्त आनंद लुटला मिरवणूक नंतर 10:30 ते 11:30 दरम्यान आर्ट मेन्शन डान्स स्टुडिओ यांचे डान्स झाले आणि शेवट धमपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली भीम क्रांती मित्र मंडळाचे आधार स्तंभ आणि भीम जयंतीचे आयोजन युवा उद्योजक रोहित गजरमल यांनी केले तर प्रथमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत जोगदंड,सिद्धार्थ तुपारे, सागर खांडेकर,रोहित सूर्यवंशी,विशाल अवधूते,प्रणव डेंगळे,सोहेल शेख,रोहित कांबळे,सुजल बोरवके,अविनाश साळवे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
