अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेने महिला दिन पुरस्कार समारंभ २०२५ साजरा केला
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या (सीआरडब्लूडब्लूओ) अध्यक्ष श्रीमती आशा मीना यांनी मध्य रेल्वेतील १४ महिला रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेने (सीआरडब्लूडब्लूओ) दिनांक २१.०४.२०२५ रोजी भायखळा येथील निर्मल पार्क येथील न्यू ऑफिसर्स क्लब येथे महिला दिन पुरस्कार समारंभ २०२५ साजरा करण्यात आला. मध्य रेल्वेच्या विविध विभागांमधील महिला कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरी आणि समर्पणाला ओळखणे आणि त्यांचा सत्कार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
एकूण १४ महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये नागपूर विभागातील २, पुणे, सोलापूर आणि मुंबई विभागातील प्रत्येकी १, भायखळा येथील डॉ. बी. ए. एम. रेल्वे रुग्णालयातील १ आणि मुख्यालयातील ८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कार्यक्रमात सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ च्या सचिव श्रीमती बबिता पांडे, सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ च्या कोषाध्यक्ष श्रीमती टीना उप्पल आणि संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते.
सीआरडब्लूडब्लूओ चा हा उपक्रम महिला कर्मचाऱ्यांना सक्षम बनवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे आणि मध्य रेल्वेच्या विकासात आणि यशात त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचे कौतुक करण्याचे एक उदाहरण आहे.
———–








