अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा अंतर्गत मंडळ अध्यक्षांची निवड.
भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा अंतर्गत 32 मंडळाचे अध्यक्ष नियुक्ती आज करण्यात आली. संघटनात्मक कार्य अधिक जोमाने उत्साहाने पुढील काळात या सर्व मंडळ अध्यक्षाच्या माध्यमातून होईल.
तसेच तसेच पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, ग्रामपंचायत व इतर सर्व निवडणुकी करिता भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक ताकतीने व जोमाने मंडळ अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कार्य करेल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस,केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, राज्याचे महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, जिल्हाध्यक्ष श्री सुधाकरजी कोहळे यांनी सर्व मंडळ अध्यक्ष यांना नियुक्तीच्या व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
प्रसिद्धी प्रमुख कपिल आदमने यांनी प्रसिद्धीपत्रकात नवनियुक्त भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा चे सर्व मंडळ अध्यक्ष यांचे नियुक्ती झालेल्या नावाची यादी प्रकाशित केली.
