प्रतिनिधी: गोपाळ भालेराव पुणे: दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी वारजे परीसरातील महामार्गाच्या बाजुला असणाऱ्या सर्विस रोड वरुन महामार्गावर जाण्यासाठी मार्ग असल्याने अनेकदा या सर्विस रोडवर एकट्या दुकट्या महिलेला पाहुण मोटार सायकल वरुन जाणा-या तरुणांनी सोनसाखळी खेचुन पळुन गेल्याच्या घटना वारजे महामार्ग परीसरात सर्विस रोडवर घडलेल्या होत्या..
त्या अनुशंगाने या गुन्ह्यांना प्रभावी पायबंद करण्यासाठी व असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरके यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने मागील दोन आठवड्यांपासुन सातत्याने या अनुशंगाने वेगवगळ्या ठिकाणचे सि.सि.टी.व्ही फुटेज व बातमीदारा मार्फत माहिती काढून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काईंगडे यांना दिलेली होती व त्यावर काम करण्यात होते.सदर माहीतीच्या विश्लेषणातुनच पोलीस अंमलदार निखील तांगडे व अमित शेलार यांना अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणा-या इसमाबाबत माहीती मिळाली की, सदरचे इसम हे एन.डी.ए ग्राउंड, वारजे येथे आहेत. त्याबाबत सदरची माहीती वरिष्ठांना कळवून त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर इसमांचा शोध घेवुन एन.डी.ए. ग्राऊंड येथुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांचे नाव १) आकाश आंबादास आंधळे, वय २४ वर्षे, रा. दागंट पाटीलनगर शिवणे, पुणे २) सुजल नरेश वाल्मिकी, वय २० वर्षे, रा. दांगट पाटील इस्टेट दुसरी कमान, शिवणे, पुणे असे सांगुन गुन्हे केल्याची कबुली दिली असुन त्यांचे कडुन चोरी केलेले सोन्याचे दागिणे व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल असा एकुण २,७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांनी तीन गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
वारजे माळवाडी पोलीस स्टेशनं अंतर्गत
गुन्हा रजि. नंबर व कलम
१०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४),३(५)/
९३/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४),३ (५)/
१५४/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४),३ (५)/ असून आरोपीना वारजे माळवाडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही करण्यात आली.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ पुणे शहर, श्री संभाजी कदम, मा. सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, श्री. भाऊसाहेब पटारे, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पो.स्टे.चे श्री. विश्वजीत काईंगडे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश बडाख, यांच्या देखरेखीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार संजीव कळंबे, शरद वाकसे, अमित शेलार, ज्ञानेश्वर चित्ते, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे, निखील तांगडे, योगेश वाघ, गोविंद कपाटे, अमित जाधव, गणेश शिंदे यांनी केली आहे.
